PHOTOS : अभिनेत्री सखी गोखलेची कातिलाना अदा; काळ्या रंगाच्या साडीत खुलले सौंदर्य

मुंबई – झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) घरा-घरात पोहचली. सखी ही अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांची मुलगी आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. सध्या सखी सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेक अपडेट तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच सखी गोखलेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊजने सखीने फॅशन केली आहे. केस मोकळे सोडत सखीने कातिल लूक केला आहे. सखीने घातलेली सिल्वर ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे. तिचे खास फोटोशूटवर सध्या चाहत्यांच्या लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. सखीच्या या फोटोवर अभिनेत्री ऋतुजा बागवे, नेहा पेंडसे आणि सायली संजीव यांनी देखील कमेंट केली आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, सखीने 2019 मध्ये अभिनेता सुव्रत जोशीबरोबर लग्नगाठ बांधली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत या दोघांनीही काम केले होते. सखीची ही पहिलीच मलिका होती. त्यापूर्वी सखीने “रंगरेझ’ या हिंदी मालिकेत छोटी भूमिका केली होती. त्याशिवाय ती मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे. “दिल, दोस्ती…’चा सिक्वेल असलेल्या “दिल, दोस्ती दोबारा’मध्येही हे दोघे एकत्र होते. तेथेच या दोघांचे सूत जुळल्याचे म्हंटले जाते.





