सखी गोखले आणि सुव्रत जोशी पुन्हा दिसणार एकत्र; नव्या नाटकाची केली घोषणा

Sakhi Gokhale And Suvrat Joshi| ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका लोकप्रिय ठरली. यात अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशीने एकत्र काम केले होते. यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. सखी आणि सुव्रत एक नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार आहेत. ‘अमर फोटो स्टुडिओ ‘नंतर हे दोघे पुन्हा एकदा या नाटकात एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे.
सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या नव्या नाटकाचे नाव ‘वरवरचे वधू वर’ असे आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णीने केले आहे. सखी आणि सुव्रतने सोशल मीडियावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. Sakhi Gokhale Suvrat Joshi|
View this post on Instagram
सखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘आमचे नवे नाटक… जोडीदार शोधणारे मादी आणि नर, वर्षानुवर्षे ज्यांनी थाटले आहे घर, आशिर्वादासाठी ज्यांचे हवेत आहेत कर, मुलांच्या काळजीने ज्यांना लागली आहे घरघर, अश्या सगळ्यांना हवे आहे मनोरंजन जर, नवे आमचे नाटक वरवरचे वधू-वर बिन प्रेमाची लव्हस्टोरी लवकरच रंगभूमीवर’, असे कॅप्शन दिले आहे. Sakhi Gokhale Suvrat Joshi|
सोशल मीडियावर सध्या सखी आणि सुव्रतच्या या नव्या नाटकाची चर्चा रंगली आहे. प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि सखी सुव्रत यांची ही बिन प्रेमाची भानगड नक्की काय असणार हे अनुभवण्यासाठी आतुर आहेत.
हेही वाचा:
‘बायोमेट्रिक्समुळे…’, राव आयएएस अकादमीमधील 3 विद्यार्थ्यां मृत्यू ; प्रत्यक्षदर्शीचा मोठा खुलासा





