छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची 18 ऑगस्टला झपुर्झामध्ये पार पडणार कार्यशाळा

कणकवली येथे राहून गेली 12 वर्ष छायाचित्रणाच्या क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची झपुर्झा आर्ट अँण्ड म्युझियममध्ये एक दिवसीय कार्यशाळा होत आहे. “अडोस-पडोस” हे त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन झपुर्झा मध्ये सुरू असून या प्रदर्शनाची संकल्पना राष्ट्रीय पारितोषीक विजेते सिनेदिग्दर्शक “उमेश कुलकर्णी “यांची आहे.
इंद्रजित खांबे यांनी कणकवलीसारख्या निमशहरी भागात राहून छायाचित्रणाला सुरूवात केली. मापले अँपल सारख्या कंपनी ने त्यांना छायाचित्रकार म्हणून निवडले व ते अँपलसाठी काम करणारे भारतातील पहिले छायाचित्रकारही आहेत. मोबाईल फोटोग्राफ्री यात त्यांचा विषेश हातखंडा असून ते सध्या पुर्णवेळ छायाचित्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या देशभरात कार्यशाळा होत असतात तसेच या कार्यशाळांना जगभरातून प्रतिसाद मिळत असतो.
इंद्रजित खांबे यांची पुण्यात प्रथमच कार्यशाळा होत असून ती येत्या १८ ऑगस्ट रोजी झपुर्झामध्ये होत आहे. या कार्यशाळेव्दारे ते त्यांच्या छायाचित्रण क्षेत्रातील अनुभवाचा फायदा विद्यार्थांना करून देणार आहेत. त्याचसोबत ते आपल्या छायाचित्रण कलेतील प्रवासाविषयी बोलणार आहेत. ज्यांना छायाचित्रण क्षेत्रात भरीव कामगिरी करायची इच्छा आहे तसेच छायाचित्रण कला छंद किंवा व्यवसाय म्हणून करायची इच्छा आहे अशा विद्यार्थांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारिख असून या कार्यशाळेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९६२३६३२४५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन झपुर्झा आर्ट अँण्ड म्युझियम तर्फे करण्यात आले आहे.






