#Photo : धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’नं पुन्हा वाढले फॅन्सचे हार्टबीट्स

मुंबई – धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ अजूनही लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन आहे. माधुरी दीक्षित तिची जबरदस्त फिल्मी इनिंग खेळल्यानंतर आता डिजिटल जगात पाऊल ठेवत आहे. नुकतंच सोशल मीडियावर माधुरीच्या आगामी ‘द फेम गेम’ या वेबसिरीजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. द फेम गेम 25 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केली जाणार आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. माधुरीच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटीवर तिच्या चाहत्यांची नेहमी नजर असते. तर, माधुरीही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या आउटफिट्समधील फोटो पोस्ट करत असते. असेच काही सुंदर फोटो पुन्हा एकदा माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. माधुरीचा हा ग्लॅमर्स लूक पाहून फॅन्स अक्षरशः तिच्या प्रेमात वेडे झाल्याचे पाहिला मिळत आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये धकधक गर्ल माधुरीचा इंडो वेस्टर्न अवतार दिसून येत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून, तिने वेगवेळ्या पोज सुद्धा दिल्या आहेत. फॅन्स नेहमीच माधुरीच्या फोटो आणि व्हिडिओला पसंती देत असतात. आणि यावेळी सुद्धा तिच्या या इंडो वेस्टर्न लूकवर फॅन्सने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, माधुरीच्या ‘द फेम गेम’ वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची कथा आहे. जिचे आयुष्य तिच्या चाहत्यांना परफेक्ट दिसते पण तिच्या आयुष्यात अनेक काळी सत्ये आहेत. ही एक सस्पेंसने भरलेली ही सीरिज चाहत्यांची उत्सुकता वाढविणारी आहे. असं माधुरीने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर सांगितलं होत.





