#फोटो कारगिल विजय दिवसाची 20 वर्ष पुर्ण…

Updated On:-10 फोटो
Photo 1
1 / 10

आणखी संबंधित फोटो

नवी दिल्ली : काश्‍मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धालाआज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय सैनिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यालाच आज 20 वर्ष पुर्ण झाले आहेत.

जवळपास दोन महिने चाललेल्या पाकिस्तानसोबतचे युद्ध हे भारतीय सैनिकांच्या साहस आणि शौर्याचे असे एक उदाहरण आहे ज्याचा प्रत्येक भारतीयांना गर्व आहे. तब्बल 18 हजार फूट उंचीवर भारताच्या जवानांनी पाकिस्तानसोबत युद्ध केले. या युद्धात 527 भारतीय जवान शहिद झाले तर 1300 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले होते.  3 मे रोजीच पाकिस्तानने आपल्या सैन्यासह कारगिलच्या डोंगराळ भागात घुसखोरी केली होती. याची माहिती भारतीय सैन्यास लागताच त्यांनी पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी जीवाची पर्वा न करता सडेतोड उत्तर दिले. त्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन विजय सुरू केले होते. या युद्धात भारताने मिग -27 आणि मिग-29 विमानांचा वापर केला होता. या विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानने ज्या भागात घुसखोरी केली आहे त्याठिकाणी मोठा बॉम्ब वर्षाव करण्यात आला होता. जगात दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा शत्रू राष्ट्रावर एवढ्या मोठ्या संख्येने बॉम्बचा वर्षाव करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय सेनेचा विरोध पाहून अखेर 26 जुलै 1999 रोजी पाकच्या सैन्यांनी माघार घेतली आणि भारतीय सैन्याने पुन्हा एकदा कारगिलवर भारतीय तिरंगा मानाने फडकावला.

आणखी संबंधित बातम्या

Shirur News : शिरूरमधील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Shirur News : शिरूरमधील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

"मातृभूमीसाठी आयुष्य..."; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

"मातृभूमीसाठी आयुष्य..."; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

'दिवाळीत फटाके फोडतांना केस जळाले होते' माधुरी दीक्षितने सांगितला किस्सा

'दिवाळीत फटाके फोडतांना केस जळाले होते' माधुरी दीक्षितने सांगितला किस्सा

Kargil Vijay Diwas: सच्ची देशभक्ती अनुभवायची असेल तर, कारगिल युद्धावर आधारित 'हे' चित्रपट एकदा पहाच !

Kargil Vijay Diwas: सच्ची देशभक्ती अनुभवायची असेल तर, कारगिल युद्धावर आधारित 'हे' चित्रपट एकदा पहाच !