satara | पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर सज्ज

फलटण, (प्रतिनिधी) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवार, दि. ९ जुलै रोजी फलटण येथील प्रशस्त पालखी तळावर (विमानतळ) एक दिवस मुक्कामासाठी विसावणार असून या सोहळ्याचे उत्साही स्वागत व व्यवस्थेसाठी फलटण नगर परिषदेसह शहरातील विविध मंडळे आणि फलटणकर नागरिक सज्ज झाले आहे.
जिंती नाका परिसरात नगरपरिषदेच्यावतीने स्वागत कमान उभारून सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी पाण्याची मुबलक प्रमाणात सोय होण्यासाठी नगरपरिषद पाणी पुरवठा केंद्रामध्ये फीडिंग पॉइंट्स उभारले असून पाणी भरण्यासाठी टँकर जाण्या-येण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
या फिडिंग पॉइंटला एक टैंकर ५ ते ७ मिनिटांमध्ये भरण्याची व्यवस्था केली आहे. शहरातून जाणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कालव्याचे ठिकाणी सद्यस्थितीत कालव्यात पाणी असल्याने १५ लाइफ गार्ड नियुक्त करण्यात आले. जिंती नाकापासून पुढे शहर हद्दीत नगर परिषदेच्यावतीने सदर व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.
स्वच्छता, पाणी, आरोग्य, प्रकाश व्यवस्थेची तयारी पूर्ण पालखी तळ आणि शहरातून जाणारा पालखी मार्ग याची स्वच्छता, पालखीतळावर आणि गावात उतरणाऱ्या दिंड्या यांच्यासाठी आरोग्य, वीज, पाणी, महिलांसाठी स्नानगृह व सर्वांसाठी शौचालये आदी सुविधा देण्याची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली असून संपूर्ण नगरपरिषद यंत्रणा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड या सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाकाचा गैस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महसूल विभागांतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पालखी तळावर स्वच्छतेची व्यवस्था पालखी तळावर (विमानतळ) फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेसह अन्य व्यवस्था करण्यात येत आहे.
पालखी तळावर चौकशी कक्ष
फलटण पालखी तळावर तात्पुरता दवाखाना चौकशी कक्ष तसेच शहरामध्ये म. फुले चौक, पाचबत्ती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डी. एड. कॉलेज चौक या पालखी तळ (विमानतळ) स्वच्छता व वीज मनोरे उभारणी कामाची पाहणी करताना मुख्याधिकारी ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात येत असून तेथे वारकरी व निखिल मोरे व अधिकारी. अहोरात्र कार्यरत असून सर्व कामे पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात मुक्कामास असल्याने पिण्याच्या व वापराच्या पाण्याची पुरेशी असल्याचे सांगण्यात आले आहे.
तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था
प्रशासनाने १ हजार फिरती शौचालये उपलब्ध होतील असे नियोजन केले असून केलेल्या नियोजनानुसार ती पालखी तळ व परिसरात लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पालखी तळावर तात्पुरती सुमारे १ हजार वराची शौचालये उभारण्यात आली असून त्यापैकी ५०० महिलांसाठी राखीव आहेत. पालखी तळावर ७ मोठे हायमास्ट टॉवर उभारून संपूर्ण पालखी तळावर उत्तम प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे
खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा
खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्याशिवाय जादा पाइप लाइन वापरून पालखी तळ आणि परिसरात पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तात्पुरत्या शौचालयांच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात येत आहे. मांस, मटण, मच्छी विक्रीवर निबंध पालखी सोहळ्याच्या येथील वास्तव्या दरम्यान फलटण शहरात मांस, मटण, मच्छी व तत्सम पदार्थ विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणान्यास दंड व शिक्षेची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले
आहे.
व्यवस्था नियंत्रण व मार्गदर्शन
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले असून त्याशिवाय प्रांताधिकारी सचिन बोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी बैठका घेऊन दिलेल्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण व्यवस्था चोख ठेवण्याचे नियोजन केले आहे. पालखी सोहळा दरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सार्वजनिक वास्तूंचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आणि वीज वाहक तारा, खांब, ट्रान्स्फॉर्मर सेंटर्स यांचे वीज वितरण कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे.





