फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: अंबादास दानवेंनी थेट ‘या’ व्यक्तीचे नाव घेत केला गंभीर आरोप

Ambadas Danve | साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा श्री किसन मुंडे (वय 30, रा. कोटरबन ता. वडवणी, जि. बीड) यांनी येथील नामांकित हॉटेल मधुदीपमधील खोलीत मध्यरात्री आत्महत्या केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
डॉ. संपदा यांनी हातावर बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. आणि प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळे मी जीव देत आहे, असं लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा शेवट केला.
इतकेच काय तर संबंधित महिला डॉक्टरवर वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता. यासाठी फलटणमधील एका खासदाराचे दोन पीए सातत्याने महिला डॉक्टरवर दबाव टाकत होते, याबाबतची माहिती एका पत्रातून समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत थेट माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर आणि फलटणचे अजित पवार गटाचे आमदार सचिन कांबळे हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि चुकीचे कामं करून घेतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे म्हणाले की, “फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता. महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याची 15 दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली आहे. त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज आला होता. मात्र त्याने त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करा. त्याने त्याचवेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असतं.” Ambadas Danve |
रणजित निंबाळकरांवर आरोप
पुढे ते म्हणाले की, “आमदार सचिन कांबळे पाटील, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. पोस्ट मार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा, राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमे लावा असले उद्योग करत होते. या तिघांवर कारवाई करा. हे तिघे त्याठिकाणी यंत्रणा चालवत होते आणि चुकीची कामे करत होते,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. Ambadas Danve |
हेही वाचा:





