Satara | चंदुकाका सराफ यांच्या फलटण शाखेचा उद्या शुभारंभ

फलटण, (प्रतिनिधी) – १९८ वर्षांची सुवर्णपरंपरा लाभलेली व शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नावीन्यता ही मूल्ये आत्मसात करून संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्या पासून जतन करत असलेल्या चंदुकाका सराफ या सुवर्णपेढीच्या दालनाचा शुभारंभ प्रभु श्रीरामांच्या पावन अशा फलटण नगरीत होत आहे.
चंदुकाका यांच्या फलटण शाखेचा शुभारंभ रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता फलटण–शिंगणापूर रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौकात विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार श्रीमंत रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,
मा नगरसेविका व समाजसेविका सौ. सुभद्राराजे निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे व चंदुकाका सराफ चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा,संचालक श्री. सम्यक किशोरकुमार शहा व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
शुभारंभानिमित्त दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट ह्या पाच दिवसांच्या कालावधीत शुभारंभ ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ह्यामध्ये रू. २०,००० पासून पुढील खरेदीवर अथवा रू. ३,००० व पुढील गुंतवणूकीवर १ ज्युपिटर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
शुभारंभाच्या ह्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तसेच त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत, त्याचा स्वीकार करून आवर्जून भेट द्या आणि आपल्या आवडीचे दागिने खरेदी करा असे आवाहन फलटणवासियांना चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 1800 267 8555 ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.





