Petrol-Desile Price : पेट्रोल-डिझेल दरांचा नवा ‘उच्चांक’; पाहा लिटरचा दर
Updated On:

नवी दिल्ली – चालू आठवड्यात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांनी नवा उच्चांक गाठला.
सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 25 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या सहा दिवसांत ती इंधने एक रूपयाने महागली.
दिल्लीत आता पेट्रोलचा दर 85 रूपये 70 पैसे, तर मुंबईत 92 रूपये 28 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल 75 रूपये 88 पैशांवर, तर मुंबईत 82 रूपये 66 पैशांवर पोहचले आहे.





