Petrol-Diesel Price Today: आजपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल ; घरातून निघण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीनतम दर पहा
Petrol-Diesel Price Today: देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Petrol-Diesel Price Today: देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असले, तरी काही ठिकाणी स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे किरकोळ बदल करण्यात आला आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, जयपूर, हैदराबाद आणि चंदीगडमध्ये दर जैसे थे आहेत. मात्र, नोएडामध्ये पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 19 पैसे महागले आहे.
दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले असून लखनौमध्ये दोन्ही इंधनांच्या दरात 30 पैशांची घट झाली आहे. पटना येथे पेट्रोल 75 पैसे आणि डिझेल 71 पैशांनी स्वस्त झाले आहे.
शहरानुसार पेट्रोलचे दर: Petrol-Diesel Price Today:
नोएडा – ₹१०१.८९ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹१०२.१२ प्रति लिटर
मुंबई – ₹१११.२१ प्रति लिटर
कोलकाता – ₹११३.५१ प्रति लिटर
चेन्नई – ₹१०७.८७ प्रति लिटर
पुणे – ₹११२.०१ प्रति लिटर
आग्रा – ₹१०१.५४ प्रति लिटर
गाझियाबाद – ₹१०२.१२ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹१०२.९७ प्रति लिटर
शहरानुसार डिझेलचे दर:
नोएडा – ₹९५.३७ प्रति लिटर
नवी दिल्ली – ₹९५.२० प्रति लिटर
मुंबई – ₹९७.८३ प्रति लिटर
कोलकाता – ₹९९.८२ प्रति लिटर लिटर
चेन्नई – ₹९९.६५ प्रति लिटर
पाटणा – ₹१००.६१ प्रति लिटर
गुरुग्राम – ₹९५.६४ प्रति लिटर
बंगळूर – ₹९९.५६ प्रति लिटर
चंदीगड – ₹८९.४७ प्रति लिटर
भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अद्ययावत केले जातात. तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, डॉलर-रुपया विनिमय दर, मालवाहतूक खर्च आणि कर यांसारख्या विविध घटकांचा विचार करून नवीन दर निश्चित करतात. जर या घटकांमध्ये लक्षणीय बदल झाला नाही, तर किरकोळ दर स्थिर राहतात.
तुमच्या शहरातील दर कसे तपासायचे? Petrol-Diesel Price Today:
जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही ते इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट्सवरून किंवा एसएमएस सेवांद्वारे सहज मिळवू शकता. याव्यतिरिक्त, तेल कंपन्या दररोज सकाळी नवीन दर अद्ययावत करतात.






