पंतप्रधान मोदींना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली
Updated On:

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवदेवता आणि धार्मिक स्थळांच्या नावावर पंतप्रधान मोदी यांनी मते मागितल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मात्र ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. ही याचिका पूर्णपणे चुकीची असून निवडणूक आयोग यासंदर्भात निर्णय घेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशात ९ एप्रिल रोजी दिलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, करतारपूर साहिब कॉरिडोर तसेच गुरु ग्रंथ साहिब यांच्या प्रती अफगाणिस्तानमधून भारतात आणल्याच्या उल्लेख करत मते मागितल्याच्या आरोप वरिष्ठ वकील आनंद जोंधळे यांनी केली होता.





