पेरिविंकल स्कूलच्या सूस शाखेने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

पुणे – शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या सूस शाखेने आता सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही आपली प्रतिभा सिध्द केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित “राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा – २०२४” मध्ये शहरातील ३० नामांकित शाळांमधून सूस शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम पाच क्रमांकांमधून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साकारलेली दगडूशेठ मंदिराची हुबेहुब प्रतिकृती, त्यातील कलात्मक बारकावे, समर्पणभाव, नेपथ्य आणि सौंदर्यीकरण यांनी उपस्थितांचे आणि परीक्षकांचे मन जिंकले. शाळेसाठी सर्वात सन्मानाचा क्षण म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, चेतनानंद महाराज पुणेकर व आमदार श्री हेमंत रासने यांच्या हस्ते प्राचार्या निर्मल पंडित मॅडम यांनी पुरस्कार स्वीकारला.
समवेत मार्गदर्शक शिक्षक शिवराज कदम, सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव व नेहा मालवदे व कृष्णा अंभूरे आदी शिक्षकगण उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती साकारली नाही, तर त्यामागील अध्यात्मिकता व भक्तिभाव देखील उभा केला असे प्रतिपादन करत प्रत्येक घटक बारकाईने अभ्यासून साकारताना विद्यार्थी एकात्मतेने काम करत होते.
हे अनुभव शिक्षणापलीकडचं खूप काही शिकवणारे ठरले असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत कौतुक केले. हे काम करताना सर्व विद्यार्थ्यांना मंदिराचा इतिहास, वास्तुशिल्प आणि परंपरा यांचा अभ्यास करता आला. हे आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील असे मत सर्व विद्यार्थ्यांनी मांडले.
तर शाळेने मुलांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्यांना व्यासपीठ आणि संस्कार दिले, हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे असे उद्गार पालकांनी केले. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर यांनी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य सौ निर्मल पंडित यांचे मनापासून अभिनंदन करत शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कलागुण आणि मूल्यशिक्षण दोन्ही रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हे यश त्या प्रयत्नाचे फलित आहे. आणि पेरिविंकल स्कूल सूस शाखेचा हा गौरव, शिक्षणासोबतच मूल्यसंस्कार, कला व सामाजिक सहभाग यांचा उत्तम संगम अधोरेखित करतो असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री बांदल सर यांनी केले.
या संपूर्ण श्रेयाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल व सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली कला शिक्षक शिवराज कदम, पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे व स्मिता श्रीवास्तव यांच्या सहयोगाने सर्व विद्यार्थी व शिक्षकगण यांच्या सहकार्याने अत्यंत बरखुबीने करण्यात आले होते.





