Sai Pallavi: “‘लोक माझ्या डोळ्यांकडे नाही, मुरुमांकडे पाहायचे…’; साई पल्लवीचा भावनिक खुलासा, २ कोटींच्या जाहिरातीलाही दिला होता नकार”
Sai Pallavi साई पल्लवीने नेहमीच समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या निकषांना विरोध केला आहे. गोरी त्वचा म्हणजेच सौंदर्य, या समजुतीला तिने अनेकदा चुकीचे ठरवले आहे. तिच्या मते, प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे नैसर्गिक रूप स्वीकारले पाहिजे. दुसऱ्यांसारखे दिसण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही.

Sai Pallavi: ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi ) सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या लूकबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या अभिनयाचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले, तर काहींनी सीतेच्या भूमिकेसाठी ती योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. या चर्चेदरम्यान साई पल्लवीची काही वर्षांपूर्वीची एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत तिने चेहऱ्यावरील मुरुम, आत्मविश्वास, सौंदर्याचे निकष आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला नकार देण्यामागचे कारण स्पष्ट केले होते. (Sai Pallavi)
साई पल्लवी ही चित्रपटांमध्ये आणि खऱ्या आयुष्यातही कमी मेकअप किंवा मेकअपशिवाय दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे अनेकजण कौतुक करतात. मात्र, तिच्यासाठी हा आत्मविश्वास सहज मिळालेला नव्हता. चेहऱ्यावरील मुरुम आणि रोझेशिया या त्वचेच्या समस्येमुळे तिला अनेक वर्षे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तिने सांगितले होते. (Sai Pallavi)
‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत साई पल्लवीने सांगितले की, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ती स्वतःच्या चेहऱ्यावरील मुरुमांमुळे खूप अस्वस्थ होती. लोक आपल्या डोळ्यांऐवजी चेहऱ्यावरील मुरुमांकडेच पाहतात आणि त्याबद्दलच बोलतात, अशी भावना तिच्या मनात सतत असायची. त्यामुळे अनेकदा घराबाहेर पडण्याचीही इच्छा होत नसे.
ती म्हणाली, “प्रेमम चित्रपटापूर्वी मी अनेक प्रकारच्या फेअरनेस क्रीम वापरल्या. चेहऱ्यावरचे मुरुम आणि त्वचेच्या रंगाबद्दल मी स्वतःलाच खूप त्रास करून घेतला. लोक माझ्या डोळ्यांकडे नाही, तर चेहऱ्यावरील मुरुमांकडे पाहतात, असंच मला वाटायचं.” (Sai Pallavi)

Sai Pallavi
मात्र, ‘प्रेमम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला. प्रेक्षकांनी तिला तिच्या नैसर्गिक रूपात स्वीकारले. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. “प्रेक्षकांनी मला जशी आहे तशी स्वीकारलं, तेव्हा मला जाणवलं की खरं सौंदर्य हे आत्मविश्वासात असतं,” असे ती म्हणाली.
साई पल्लवीने नेहमीच समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या निकषांना विरोध केला आहे. गोरी त्वचा म्हणजेच सौंदर्य, या समजुतीला तिने अनेकदा चुकीचे ठरवले आहे. तिच्या मते, प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे नैसर्गिक रूप स्वीकारले पाहिजे. दुसऱ्यांसारखे दिसण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही. (Sai Pallavi)
याच विचारांमुळे तिने तब्बल २ कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीलाही नकार दिला होता. या निर्णयाबद्दल बोलताना तिने सांगितले की, एखाद्या जाहिरातीमुळे लाखो लोकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चुकीचा संदेश देणाऱ्या गोष्टींचा प्रचार करणे तिला योग्य वाटत नाही. (Sai Pallavi)
तिने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील अनेकांना त्वचेच्या रंगामुळे किंवा समाजाने ठरवलेल्या सौंदर्याच्या निकषांमुळे कमी लेखले गेले. त्यामुळे अशा जाहिराती लोकांच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात, असे तिचे मत आहे.
साई पल्लवीच्या या स्पष्ट भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. अभिनयासोबतच तिचा साधेपणा, नैसर्गिक व्यक्तिमत्त्व आणि स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश यामुळे ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. विशेषतः त्वचेच्या समस्या किंवा सौंदर्याबाबत न्यूनगंड असलेल्या तरुण-तरुणींना तिची कहाणी आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा देते.





