रहिमतपूर : ‘‘कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ते सत्तेच्या लालसेपोटी न येता विकासाच्या मुद्द्यावर आणि माजी आमदार जे 25 वर्ष करू शकली नाही ती कामे एका वर्षात मार्गी लावू शकलो त्यामुळे हे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत,’’ असे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले. येथील माजी उपनगराध्यक्ष नाना एकनाथ राऊत व माजी नगरसेवक विकास पांडुरंग माने यांनी तसेच आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक संघटनेचे कोरेगावचे अध्यक्ष अमर मदने यांनी कार्यकर्त्यासह आज भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात व कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार मनोज घोरपडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्रामुख्याने हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजना, पाल इंदोली उपसा सिंचन योजना, उंब्रजचा पारदर्शक उड्डाणपूल, कराड उत्तरमधील प्रत्येक गावात केलेली विकास कामे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने होणारा विकास रहिमतपूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच एका आर्थिक वर्षामध्ये आणलेली विकास कामे, रहिमतपूरमधील प्रत्येक समाजाला विश्वासात घेऊन केलेली कामे या सर्व कारणांमुळेआज कराड उत्तरमध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरु आहे.’’ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने, विरोधी पक्ष नेते नीलेश माने, माजी नगरसेवक साहेबराव माने, धनंजय पवार, मधुकर सावंत, प्रवीण माने, शंकर भोसले, रणजित माने, रहिमतपुर मंडल अध्यक्ष राजू रोकडे, विक्रम माने, शेखर माने पाटील, अशोक माने, तुषार चव्हाण, जगदीश गायकवाड, प्रल्हाद शेरकर, दिलीप शेरकर, लिंबाजी सावंत, महेश भोसले, सुहास माने, दिलीप शेवाळे, सतीश भोसले, आदिराज माने,अक्षय चव्हाण, प्रवीण कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यशवंत चव्हाण, बाळासाहेब गोरेगावकर, धनंजय माने, सुनील विठ्ठलराव माने, बापू राऊत (मिस्त्री), किसनराव राऊत, बाळासो निकम, महेश शेरकर, अरुण नलवडे, बजरंग राऊत, सचिन नलावडे, अंकुश बोराटे, सुरेश निकम, राजेंद्र शेडगे, लाला माने, अंकुश खवळे, लहूराज खवळे, गौरव कुलकर्णी, उमेश गोरेगावकर, विवेक पवार, तसेच मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश घेतलेले विक्रमसिंह माने, माजी नगरसेवक विकास तुपे, माजी उपनगराध्यक्ष साहेबराव माने, माजी नगरसेवक प्रशांत भोसले यांचा सत्कार करण्यात आला.