भूस्खलनग्रस्त वायनाड भागात जमिनीखालून येतोय गूढ आवाज; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Updated On:

वायनाड (केरळ) – केरळच्या भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यातील एडक्कल भागात राहणाऱ्या लोकांनी तक्रार केली की त्यांना जमिनीखालून आवाज येत असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी पत्रकारांना सांगितले की आज त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि धक्का बसल्यासारखी खळबळ उडाली आणि त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरू केली. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सांगितले की ते भूकंपाच्या नोंदी तपासत आहेत आणि काही विसंगत प्रकार घडला आहे काय हे शोधण्यासाठी स्थानिक भागात ते तपास करीत आहेत.
तथापि आतापर्यंत भूकंपाच्या नोंदी किंवा हालचालींचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला हा मोठा आणि गूढ आवाज ऐकू आला.





