“भावनिक राजकारण करून लोकांना…”; वाघनखांवरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारला सुनावले

Jitendra Awhad| लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु अफजल खान वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली हीच वाघनखं असल्याबाबत अनिश्चितता असल्याचे स्पष्टीकरण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे.
त्याबाबतचे पत्र आपल्याकडे असल्याचा असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यामुळे वाघनखांबाबतचा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका
“अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती, अशी घोषणा सरकारनेच करून टाकली,” असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. Jitendra Awhad|
अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही.… pic.twitter.com/E3cuxnR9K0
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 8, 2024
पुढे ते म्हणाले, “आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, ” म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही.” म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. Jitendra Awhad|
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखं आणत असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या पत्र व्यवहारात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी मात्र वसुलीत मग्न





