न्हावरे येथे कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

निमोणे – शिरुर-चौफुला गावच्या हद्दीत न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या व्यक्तीस धडक दिली.
हा अपघात १९ तारखेला १ १ : ३ ० सुमारास घडला असून या अपघात विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३) वर्षे, रा. न्हावरे ता. शिरूर,जि.पुणे हे गंभीर जखमी झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक पळुन गेला असून अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद नितीन दत्तात्रेय हांडे (वय ३२) यांनी दिली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी सांगितले की,’शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ शिरुर बाजुकडुन भरधाव वेगाने आलेला कंटेनर क्रं एन एल ०१ ए जी ३६५७ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या कडेने पायी चाललेले विठ्ठल नारायण निंबाळकर यांना पाठीमागुन धडक बसल्याने अपघात होवुन अपघातात त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागुन ते गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर कंटेनर चालक पळुन गेल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे नितीन दत्तात्रेय हांडे यांनी फिर्याद दाखल केल्याने अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार जाधव हे करत आहेत.





