Peanuts । Benefits : वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळ्यातील थंडावा या उष्णतेपासून मोठया प्रमाणात आराम देतो. तसेच या दिवसात आपण कोणते पदार्थ खाऊ नये किंवा कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा असे अनेक सल्ले लोक देत असतात. मात्र, हिवाळ्यात ‘भुईमुगाच्या शेंगा’ खाण्याचा सल्ला का दिला जातो? याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. कारण आता शेंगदाणे तुमच्यासाठी फक्त चवीचा स्रोत नाही. आता आरोग्याचे साधन बनले आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही ते हिवाळ्यात खाण्यास सुरुवात करता. हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले जाते. तसंच, थंडीच्या दिवसात शेंगदाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, यावर एक नजर टाकुयात. हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे : – हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात अनेक पोषक घटक असतात. शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळं शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते. तसंच, हेल्दी हार्टसाठी देखील चांगले असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. – यात प्रोटिन आणि फायबर असतात त्यामुळं एनर्जी बूस्ट करण्यास फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात शरीराला एनर्जीची अधिक गरज भासते, ती यामुळे पूर्ण होते. – हिवाळ्यात आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. अशावेळी शेंगदाण्यातील व्हिटॅमिन B3 त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. – शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करते. शेंगदाण्यातील व्हिटॅमिन-E रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्यात ताप सर्दी सारखे आजार वाढतात. अशा वेळी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे असते. – शेंगदाण्यातील प्रोटिन आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त आहेत.