PCMC School Result – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी माध्यमातील 17 शाळांचा सरासरी निकाल 88.59 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. तर महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळांचा एकूण निकाल 97.87 टक्के लागला आहे. महापालिकेच्या दहावीच्या शाळांचा मागील २०२४-२५ या वर्षात एकूण निकाल ९३ टक्के लागला होता. त्यापूर्वी २०२३-२४ वर्षात ९५.३६ टक्के निकाल होता. मागील दोन वर्षात पाच टक्क्यांनी निकाल घसरला आहे. मराठी माध्यमाचा गतवर्षी ९३.८२ टक्के असलेला निकाल यावेळी थेट ८८.५९ टक्के इतका खाली आला आहे. तर,उर्दू माध्यमाचा ९६.२ असलेला वाढ झाली असून ९७.८७ टक्के इतका निकाल आहे. परंतु उर्दू माध्यमाच्या आठ शाळांमधील एकही विद्यार्थी ९० टक्क्यांपर्यंत पोहचू शकला नाही. मराठी माध्यमातील १७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. महापालिकेच्या मराठी माध्यमातील शाळांमधून दहावी परीक्षेसाठी एकूण 2 हजार 405 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 273 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये 90 टक्के व त्यापुढील गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 इतकी आहे. तसेच 80 ते 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 139 एवढी आहे. महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय फुगेवाडी या शाळेचा सर्वाधिक शंभर टक्के निकाल लागला. तर सर्वांत कमी .िनकाल माध्यमिक विद्यालय रुपीनगरचा 62.92 टक्के इतकल ागला आहे. उर्दू माध्यमातील ८ शाळांमधून एकूण 520 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 5०6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 11 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून 3 विद्यार्थी गैरहजर राहिले. उर्दू माध्यमात 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारा एकही विद्यार्थी नसला तरी 80 ते 90 टक्के गुण मिळविणारे 12 विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमातील माध्यमिक विद्यालय आकुर्डी, माध्यमिक विद्यालय कासारवाडी, माध्यमिक विद्यालय नेहरूनगर आणि माध्यमिक विद्यालय लांडेवाडी या शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी केली आहे.