PCMC Election: प्रभाग क्रमांक २६ मध्ये पोस्टमननी घेतली रविराज काळेंची भेट

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पोस्टमन आले भेटायला या अभिनव उपक्रमामधून रविराज काळे यांनी प्रभागात आजपर्यंत केलेली कामे थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून घराघरात जाऊन कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याच्या अडचणींवर केलेली कामे, ड्रेनेज लाइन दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण,
स्वच्छता मोहिमा तसेच नागरिकांच्या तक्रारींवर वेळेवर घेतलेली दखल याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.पोस्टमन आले भेटायला हा उपक्रम केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, तो कामाची थेट माहिती देणारा आणि नागरिकांशी संवाद साधणारा एक प्रभावी मंच ठरत आहे. या माध्यमातून रविराज काळे यांनी प्रभागासाठी केलेल्या विकासकामांचा आढावा नागरिकांपर्यंत पोहोचत असून,
पुढील काळात प्रभागात कोणत्या नवीन सुविधा आणि योजना राबवणार आहेत याचीही दिशा लोकांसमोर स्पष्ट केली जात आहे. या उपक्रमामुळे उमेदवार आणि नागरिकांमधील नाते अधिक मजबूत होत असून, विश्वास, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर आधारित राजकारणाचा सकारात्मक संदेश प्रभाग क्रमांक २६ मध्ये घराघरात पोहोचत आहे.





