प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने शनिवारी एकूण ३६ नामानिर्देशन पत्रे दाखल करण्यात आले आहेत. २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रकि्रया सुरू झाली असून आतापर्यंत एकूण ४९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.आम आदमी पक्ष वगळता अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तरी उमदेवारांकडून पक्षाच्या नावाने अर्ज भरण्यात आले आहेत. यात भाजप, काॅंग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या नावांनी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. अपक्षांची संख्या देखील मोठी असल्याचे दिसून येत आहे. अ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभागांसाठी १२ अर्ज, ब क्षेत्रीय कार्यालय ४ अर्ज, क क्षेत्रीय कार्यालय ७ अर्ज, ड क्षेत्रीय कार्यालय ५ अर्ज, ग क्षेत्रीय कार्यालय ५ अर्ज, ह क्षेत्रीय कार्यालय ३ अर्ज दाखल झाले आहेत.