PCMC Election 2025: प्रभागरचना जाहीर! चार सदस्यांचे 32 प्रभाग; 2017 नुसारच प्रभागरचना, किरकोळ बदल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभागरचनेला शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी मान्यता दिली. त्यानंतर सायंकाळी आठ वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. तसेच शुक्रवारी रात्री उशिरा महापालिका मुख्यालयाच्या आवारामध्ये प्रभागरचनेचे नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यात आली. प्रभगरचना कशी असेल हे जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुकांनी गर्दी केली होती. तर काहींनी संकेतस्थळावर नकाशे पाहत आपल्या निवडणुकीचा अंदाज घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्यात येत आहेत. महापालिकेची फेब्रुवारी २०२१७ नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, महापालिका १२ मार्च २०२२ पासून बरखास्त आहे.
आयुक्त हे प्रशासक म्हणून १३ मार्च २०२२ पासून संपूर्ण महापालिकेचे कामकाज पाहत आहेत. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध कऱण्यात आले.
प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी अशी उतरत्या क्रमाने करण्यात आली आहे. शहराची सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग नकाशे बनविण्यात आले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे.
आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व अभियंत्यांची मदत घेण्यात आली. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या जुन्या प्रभागानुसारच नवीन प्रभागरचना आहे. त्यामध्ये किरकोळ काही ठिकाणी थोडासा बदल करण्यात आला आहे.
हरकती स्वीकारण्यास सहा दिवसांची मुदत-
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. त्यावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेत प्रभागरचना अंतिम करून नगर विकास विभागाला सादर करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
“पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ नुसारच रचना असून त्यामध्ये कोणतेही बदल नाही. नागरिकांना त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.”
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग. पिं.चिं. महापालिका.
कशी आहे प्रभागरचना –
-चिखलीचा प्रभाग क्रमांक १ तर, सांगवीचा प्रभाग क्रमांक ३२
-चार सदस्यीय ३२ प्रभाग
-सन २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या
-१ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार
-शहरात एकूण 17 लाख 751 मतदार
…
असे असणार प्रभाग आरक्षण-
महिला संख्या- ६४
पुरूष संख्या- ६४
अनुसूचित जाती- २०
अनुसूचित जमाती- ३
इतर मागास वर्ग (ओबीसी)- ३५
सर्वसाधारण महिला (खुला)- ३५
एकूण आरक्षित जागा- ९३
सर्वसाधारण (खुला)- ३५
एकूण जागा-१२८
-प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वरील आरक्षण सोडत काढली जाईल.
…
कशी आहे प्रभागरचना ?
प्रभाग क्रमांक १ – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती आदी
प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, दुदळवाडी भाग आदी
प्रभाग क्रमांक ३ – मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा,, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी. चऱ्होली,. डूडूळगाव आदी
प्रभाग क्रमांक ४ – दिघी गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर, कृष्णानगर आदी,
भाग २
प्रभाग क्रमांक ५ – रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत आदी
प्रभाग क्रमांक ६ – धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरुनगर आदी
प्रभाग क्रमांक ७ – शितलबाग, सेच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर आदी
प्रभाग क्रमांक ८ – जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर आदी
प्रभाग क्रमांक ९ – टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्मनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर आदी
प्रभाग क्रमांक १० –मोरवाडी, लालटोपीनगर, इंदीरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर आदी
प्रभाग क्रमांक ११ – नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर आदी
प्रभाग क्रमांक १२ – तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती आदी
प्रभाग क्रमांक १३ – निगडी गावठाण, सेक्टर २२, ओटास्किम, म्हेत्रेवस्ती, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण ंदिर, साईनाथनगर आदी
प्रभाग क्रमांक १४ – चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाईवस्ती आदी
प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर न २४, २५, २६, २७, २८, सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत आदी
प्रभाग क्रमांक १६ – वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर २९, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे आदी
प्रभाग क्रमांक १७ – दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भओईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, बिजलीनगर आदी
प्रभाग क्रमांक १८ – एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर ,तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क आदी
प्रभाग क्रमांक १९ विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईल कॉलनी, गावडे पार्क, भिमनगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई पिंपरी कॅम्प आदी
प्रभाग क्रमांक २० – विशाल थिएटर परिसर, एच ए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी, कासारवाडी, कुंदननगर आदी
प्रभाग क्रमांक २१ – मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता रुग्णालय, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदीर आदी
प्रभाग क्रमांक २२ – काळेवाडी विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतिबा नगर, नढेनगर आदी
प्रभाग क्रमांक २३ – प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आदी
प्रभाग क्रमांक २४ – आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर आदी
प्रभाग क्रमांक २५ – माळवाडी,पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक २६ – पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी आदी
प्रभाग क्रमांक २७ – तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, आकाशगंगा सोसायटी आदी
प्रभाग क्रमांक २८ – फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन आदी
प्रभाग क्रमांक २९ – कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर आदी
प्रभाग क्रमांक ३० – शंकरवाडी भाग, सरीता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदन नगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थ नगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस टी वर्क शॉप आदी
प्रभाग क्रमांक ३१ – राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डेनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय आदी
प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण





