PBKS vs RR : राजस्थानचा सलग दुसरा ‘रॉयल’ विजय! आर्चरच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाबने टेकले गुडघे

PBKS vs RR Rajasthan Royals beat Punjab Kings by 50 runs : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ५० धावांनी पराभव करत त्यांचा विजयी रथ रोखला. शनिवारी मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, राजस्थानने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत चार गडी गमावून २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १५५ धावाच करता आल्या. अशाप्रकारे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने सलग दुसरा विजय नोंदवला.
अखेर राजस्थानने पंजाबचा विजयी रथ रोखला –
अशाप्रकारे, पंजाब किंग्जला या हंगामात पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर या पराभवाचा सामना करावा लागला, जिथे ते या हंगामातील पहिला सामना खेळत होते. नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि नवा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. राजस्थानला पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता पण तिसऱ्या सामन्यात संघाने विजय मिळवला. अशा परिस्थितीत, हा सामना दोन्ही संघांसाठी सोपा असणार नव्हता. पण सुमारे ४ तासांच्या सामन्यानंतर निकाल एकतर्फी ठरला आणि तोही पाहुण्या संघाच्या बाजूने लागला.
Convincing outing 👏
🔙 to 🔙 wins ✌Rajasthan Royals spoil #PBKS' homecoming with a strong 5️⃣0️⃣-run victory 🩷
Updates ▶ https://t.co/kjdEJyebLM#TATAIPL | #PBKSvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/LqAYRNEpC3
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
राजस्थानचा सलग दुसरा ‘रॉयल’ विजय –
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्यासाठी, कर्णधार संजू सॅमसन (३८) आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने फक्त १०.२ षटकांत ८९ धावांची भागीदारी केली. मागील तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या यशस्वीने (६७) अखेर आपली जादू दाखवली आणि हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. यानंतर, रियान परागने फक्त २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी खेळली आणि संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या काळात पंजाबने काही झेल सोडले, ज्याचा फायदा राजस्थानला झाला. राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून २०५ धावा केल्या, जो या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – PBKS vs RR : आऊट झाल्यानंतर संतापला संजू सॅमसन; रागाच्या भरात केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने पंजाबचे कंबरडे मोडले –
यानंतर, राजस्थानच्या गोलंदाजांची पाळी होती आणि त्याची सुरुवात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केली. हंगामातील पहिल्या दोन सामन्यात एकही विकेट न घेता १०० पेक्षा जास्त धावा देणाऱ्या आर्चरने यावेळी पहिल्याच षटकात पंजाबचे कंबरडे मोडले. आर्चरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर प्रियांश आर्यला बाद केले आणि नंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. लवकरच संघाने फक्त ४३ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या.
हेही वाचा – CSK vs DC : ‘मला वाटलं नव्हतं की इतक्या सहज…’, सीएसकेचा एकतर्फी पराभव केल्यानंतर अक्षर पटेलच मोठं वक्तव्य
मॅक्सवेल-वढेराची झुंज ठरली अपयशी –
I.C.Y.M.I
Some impressive shots were on display 👌
Nehal Wadhera with another eye-catching innings of 62(41) 👏
Updates ▶ https://t.co/kjdEJydDWe#TATAIPL | #PBKSvRR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/xeAysSAelb
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
त्यानंतर, ग्लेन मॅक्सवेल (३०) आणि नेहल वधेरा (६२) यांनी ८८ धावांची शानदार भागीदारी करून संघाच्या आशा जिवंत ठेवल्या परंतु ते दोघेही १५ व्या आणि १६ व्या षटकात सलग चेंडूंवर बाद झाले आणि संघ पुनरागमन करू शकला नाही. २० षटकांत ९ विकेट्स गमावल्यानंतर पंजाबला फक्त १५५ धावा करता आल्या. आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर संदीप शर्मा आणि महेश तीक्शनानेही प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.





