PBKS vs RCB : आरसीबीने पंजाबचा धुरळा उडवत नऊ वर्षांनी फायनलमध्ये मारली धडक, गोलंदाज ठरले गेमचेंजर

PBKS vs RCB Royal Challengers Bangalore enter IPL 2025 final : आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर आरसीबीने पंजाबचा ८ विकेट्सनी धुरळा उडवत ९ वर्षांनंतर फायनलमध्ये धडक मारली. यापूर्वी २०२१६ मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. या सामन्यात आरसीबीने प्रथम घातक गोलंदाजी केली आणि पंजाब किंग्जला फक्त १४.१ षटकात १०१ धावांवर रोखले. यानंतर प्रत्युत्तरात १० षटकांत २ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह एकूण चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर पंजाब किंग्जच्या फलंदाजांची चांगलीच दाणादण उडाली. आरसीबीकडून जोश हेझलवूडने २१ धावांत ३, सुयश शर्माने ३, यश दयालने २, भुवनेश्वर कुमारने १ आणि रोमारियो शेफर्डने १ विकेच्स घेत पंजाब किंग्जचा संघ १०१ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात आरसीबीने विराट (१९) आणि मयंकची (११) विकेट गमावून फिलिप सॉल्ट (५७) आणि कर्णधार पाटीदारच्या (१५) नाबाद खेळीच्या ऐतिहासिक विजय मिळवला.
Say Hello to the first 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐈𝐒𝐓𝐒 of #TATAIPL 2025 ❤#RCB fans, how elated are you? 🤩
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/gmnjZsFWxF
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
चौथ्यांदा फायनलमध्ये मारली एन्ट्री –
𝙏𝙝𝙖𝙩’𝙨 𝙝𝙤𝙬 𝙮𝙤𝙪 𝙨𝙚𝙖𝙡 𝙖 𝙥𝙡𝙖𝙘𝙚 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙛𝙞𝙣𝙖𝙡𝙨 ❤
🎥 Captain Rajat Patidar fittingly finishes off in style as #RCB are just one step away from the 🏆
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/hXhslIqcDZ
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
आरसीबी संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, संघाने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आयपीएल फायनल खेळले होते, परंतु तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. आता आरसीबी संघ ९ वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि यामुळे हा संघ विजेतेपद जिंकू शकेल अशी सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. चालू हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, संघाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.
हेही वाचा – IPL 2025 : आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर! विराटच्या आक्रमक सेलिब्रशनने गाजवलं मैदान, पाहा VIDEO
फिल सॉल्टने झळकावले अर्धशतक –
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही घाई दाखवली नाही. विराट कोहली १२ धावा करून बाद झाला आणि मयंक अग्रवाल १९ धावा करून बाद झाला. पण फिल सॉल्ट क्रीजवर राहिला आणि त्याने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबचे सर्व गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले आणि त्यांना प्रभाव पाडता आला नाही. सॉल्टने सामन्यात २७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. कर्णधार पाटीदारने षटकार मारून संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. त्याने एकूण १५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : आरसीबीच्या जेतेपदासाठी चाहत्याचं देवाकडं साकडं, VIDEO होतोय तुफान व्हायरल
पंजाबच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर टेकले गुडघे –
Rising to the occasion ✨
Suyash Sharma wins the Player of the Match award for his web-spinning spell 🕸️👏
Relive his superb performance ▶️ https://t.co/1SDOOs5TgO#TATAIPL | #PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/8fAdYdloQv
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
पंजाब किंग्जच्या फलंदाजांना सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. संघाचे फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यामध्ये मार्कस स्टोइनिस (२६ धावा), अझमतुल्ला उमरझाई (१८ धावा) आणि प्रभसिमरन सिंग (१८ धावा) यांचा समावेश होता. उर्वरित खेळाडू धावा काढणे तर दूरच, त्यांना क्रीजवर टिकूनही राहता आले नाही. अशा या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघ पूर्ण २० षटके खेळू शकला नाही आणि फक्त १०१ धावांवर बाद झाला. आता पंजाबाचा पुढील सामना क्वालिफाय २ मध्ये एलिमिनेटरमधील विजेत्या संघाशी रविवारी होईल.





