PBKS vs DC : दिल्लीला पहिला धक्का.. अर्षदिप सिंगने दिला पंजाबला पहिला ब्रेक थ्रू

PBKS vs DC : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतला आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. सुरुवातीला दोघांनी आक्रमक बॅटिंग करत बॉलर्सवर चांगलाच दबाव टाकला. मात्र अर्षदिप सिंगला ही जोडी फोडण्यात यश आले. | PBKS vs DC
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मिचेल मार्शला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीला वेगवान सुरुवात करून तीन षटकांत धावसंख्या ३० च्या पुढे नेली.
पण चौथे षटक टाकायला आलेल्या अर्शदीपने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्शला झेलबाद केले. 12 चेंडूत 20 धावा करून मार्श बाद झाला. शाई होप वॉर्नरसोबत क्रीजवर आला. | PBKS vs DC
दिल्लीची धावसंख्या ३ षटकांनंतर
दिल्ली कॅपिटल्सने 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 33 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 11 आणि मिचेल मार्श 14 धावांसह खेळत आहे. | PBKS vs DC
ऋषभ पंत मैदानात परतला
डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झाल्याने पंत गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. पंजाबचे चार परदेशी खेळाडू म्हणजे जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान आणि कागिसो रबाडा. त्याचवेळी दिल्लीचे चार विदेशी खेळाडू शाई होप, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत. | PBKS vs DC
अशी आहे प्लेयिंग इलेव्हन
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग. प्रभाव पर्याय: रिले रुसो, प्रभसिमरन सिंग, तान्या थियागराजन, हरप्रीत सिंग, विद्वत कविरप्पा.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा. प्रभाव पर्याय: अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, जेक फ्रेझर, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे





