PBKS vs CSK : प्रियांश आर्यच्या वादळी शतकाच्या जोरावर पंजाबने मारली बाजी, चेन्नईचा सलग चौथा पराभव

PBKS vs CSK Punjab Kings beat Chennai Super Kings by 18 runs : आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जने घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गेल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, २४ वर्षीय तरुण फलंदाज प्रियांश आर्यने स्फोटक शतक झळकावून संघाचे लक्ष वेधून घेतले आणि संघाला २१९ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात चेन्नईसाठी हे लक्ष्य खूप मोठे ठरले आणि निर्धारित षटकांत २०१ धावाच करु शकला. ज्यामुळे सलग चौथा पराभव पत्करावा लागला.
पंजाबच्या फलंदाजांनी जीवनदानाचा घेतला फायदा –
पंजाब आणि चेन्नई यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी होती. तथापि, या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही संघांनी एकमेकांना भरपूर संधी दिल्या. फरक फक्त एवढाच होता की कोणत्या संघाने त्या संधींचा फायदा घेतला? या बाबतीत पंजाब पुढे होता आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा होता तरुण सलामीवीर प्रियांश, ज्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर त्याला जीवनदान मिळाले. यानंतरही त्याचे दोन झेल सुटले आणि त्याने शतक ठोकून चेन्नईला शिक्षा दिली. चेन्नईने एकूण ४ झेल सोडले, तर पंजाबनेही तेवढेच झेल सोडले. पण चेन्नईच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही.
A Star is Born ✨
Priyansh Arya wins the Player of the Match award for his magnificent 1⃣0⃣3⃣🙌
Scorecard ▶ https://t.co/HzhV1VtSRq #TATAIPL | #PBKSvCSK | @PunjabKingsIPL pic.twitter.com/kNBABp6O79
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
प्रियांश आर्यने झळकावले वादळी शतक –
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने या मैदानावर आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या केली पण संघाला येथे पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्याच षटकात दोन षटकार मारून प्रियांशने आपले इरादे स्पष्ट केले पण दुसरीकडे, इतर फलंदाज सतत बाद होत होते. पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स पडल्या आणि ८ व्या षटकात ५ विकेट्स पडल्या, तर धावसंख्या फक्त ८५ धावांची होती. यामध्ये बाद झालेल्या फलंदाजांचे योगदान फक्त २३ धावांचे होते. तथापि, प्रियांशने प्रथम १९ चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावले आणि नंतर १३ व्या षटकात, त्याने मथिशा पाथिरानाच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार आणि एक चौकार लगावत केवळ ३९ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्यानंतर, शशांक सिंग आणि मार्को जानसेन यांनी ६५ धावांची शानदार भागीदारी करून संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा – KKR vs LSG : शार्दुल ठाकूरने केला लाजिरवाणा विक्रम, एका षटकात ११ चेंडू टाकताना लावली वाईडची रांग
गेल्या ६ वर्षांच्या विक्रमाकडे पाहता, चेन्नईसाठी हे लक्ष्य आधीच कठीण वाटत होते पण यावेळी रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या सलामी जोडीने त्यांच्यासाठी स्थिर सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट पडू दिली नाही आणि ५९ धावा जोडल्या पण संघाच्या गरजेनुसार ही वेगवान सुरुवात नव्हती. सातव्या षटकात रचिन बाद झाल्यानंतर आलेला कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा अपयशी ठरला. यानंतर कॉनवे आणि शिवम दुबे यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांमध्ये ८९ धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये काही षटके संघासाठी चांगली होती पण तरीही धावगती आवश्यकतेपेक्षा कमी होती.
हेही वाचा – PBKS vs CSK : प्रियांश आर्यने रचला इतिहास! पहिल्या चेंडूवर षटकार अन् ३९ चेंडूत झळकावलं शतक
कॉनवेने आपले अर्धशतक पूर्ण केले असले तरी, दुबे बाद झाल्यानंतर, त्यालाही रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून शेवटी आवश्यक धावा करता येतील. दरम्यान, पाचव्या क्रमांकावर आलेल्या एमएस धोनीने काही उत्कृष्ट फटके खेळून आशा उंचावल्या. २० व्या षटकापर्यंत त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारला होता. चेन्नईला शेवटच्या षटकात २८ धावांची आवश्यकता होती, जी अशक्य वाटत होती पण धोनीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने सर्व आशा संपुष्टात आल्या. संघ फक्त २०१ धावा करू शकला आणि १८ धावांनी पराभूत झाला.





