PBKS vs DC सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू घाईघाईने बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल

PBKS and DC players leaving stadium match cancelled in Dharamshala : आयपीएल २०२५ मध्ये ८ मे रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. मात्र, भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यामुळे सामना अचानक रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू स्टेडियममधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये खेळाडू घाईघाईने स्टेडियममधून बाहेर पडताना दिसत आहेत.
सामना रद्द झाल्यानंतर, खेळाडू घाईघाईने स्टेडियम सोडताना दिसले –
धर्मशाला येथील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव मध्येच थांबवण्यात आला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १० षटकांत १२२ धावा केल्या. तथापि, अचानक ११ व्या षटकात फ्लडलाइट्स गेले. त्यानंतर, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सीमारेषेजवळ उभे राहून सुरक्षेच्या कारणास्तव चाहत्यांना मैदान सोडण्याचा इशारा केला.
View this post on Instagram
दरम्यान, सामना रद्द झाल्यानंतर खेळाडूंनीही मैदान सोडले. यावेळी, काही खेळाडू बसमध्ये चढताना घाईत असल्याचे दिसून आले. ज्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, व्हिडिओमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू भारत-पाकिस्तान तणावाबाबत चिंतामुक्त असल्याचे दिसून आले. ज्यामुळे ते धर्मशालाहून दिल्लीकडे जाताना घाईत दिसले. या क्लिपवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – PSL 2025 : यूएईचा पीएसएल 2025 च्या आयोजनास नकार? भारत-पाक तणावाचा परिणाम
आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित –
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित पुढे ढकलली आहे. उर्वरित १६ सामने एका आठवड्यानंतर नवीन वेळापत्रक आणि ठिकाणासह आयोजित केले जाऊ शकतात. याबाबत, बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे.





