स्वतःच्या खिशातून द्यावा पैसे..! क्रिकेटपटूंवर कोट्यवधीची उधळण, विरोधकांची शिंदे सरकारवर जोरदार टीका

Vijay Wadettiwar | Eknath Shinde | Ambadas Danve : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली.
याआधी बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या धनादेश दिला. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘वर्ल्डकप विजेत्या टीमला खूप पैसे मिळतात. भारताची स्पोर्ट्स स्पिरिट चांगली आहे. त्यांच्या भावनांची कदर करत मुख्यमंत्री यांनी घोषणा केली. पण जर ते देशासाठी खेळत असतील, तर त्यांना पैशांची गरज काय? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
#WATCH | Nagpur: Maharashtra Assembly LoP Vijay Wadettiwar says, “… In the last 4 months, 1068 farmers have committed suicide. It would have been good had they given money to the distressed farmers. They gave such a huge sum to the Indian Cricket Team, what was the need?…… pic.twitter.com/icoelZKMGz
— ANI (@ANI) July 6, 2024
एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे. गेल्या चार महिन्यात 1068 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. भाजप नेते त्यांना मदत करत नाही आणि खेळाडूंना 11 कोटी रुपये देतात, असेही वडेट्टीवार म्हणाले.
तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नाही. त्यांनाही गरज नाही. बीसीसीआयकडे खूप पैसे जमा आहेत. त्यातून त्यांना मानधन मिळते.
क्रिकेटपटूंचा आदर करायला हवा, यात काहीही शंका नाही. पण त्यासाठी एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्यापक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावा, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.





