3 कोटी द्या, नाही तर लैंगिक छळ…; प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाला दिली धमकी; पोलिसात तक्रार दाखल

Prajjwal Revanna | Suraj Revanna – अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा याचा भाऊ सूरज याने आपल्याला ब्लॅक मेल केले जात असल्याची तक्रार दाखल केली आहे.
आपल्याकडून ३ कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली असून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार सुरेशच्या वतीने त्याच्या एका मित्राने दाखल केली आहे.
चेतन नावाच्या एका व्यक्तीने सूरज यांनी नोकरीसाठी त्याची शिफारस करावी असा दबाव टाकला होता. त्यानंतर चेतनने सूरज यांनी लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरज यांच्यावर केला.
सूरज यांनी आपली मागणी पूर्ण केली नाही तर त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची धमकी देण्यात आली व ३ कोटी रूपयांची खंडणीही मागण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चेतनने अगोदर पाच कोटींची मागणी केली होती, मात्र नंतर ती रक्कम तीन कोटी रूपये करण्यात आली. दरम्यान, आता चेतन आणि त्याच्या मेव्हण्याच्या विरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याचा पिता रेवण्णा यांच्यावर अगोदरच लैंगिक शोषण प्रकरणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आहेत.





