सिंगापूरच्या शाळेला आग ! पवन कल्याण यांचा मुलगा जखमी ; उपमुख्यमंत्री लवकरच रवाना होणार

Pawan Kalyan’s Son Injured । आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांचे धाकटे पुत्र मार्क शंकर सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीच्या घटनेत जखमी झाले आहेत. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर त्याला सिंगापूरमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियोजित कार्यक्रम पूर्ण करून सिंगापूरला होणार रवाना Pawan Kalyan’s Son Injured ।
पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पवन कल्याण यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण करून सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. जनसेना पक्षाने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, “पवन कल्याण यांनी काल अराकूजवळील कुरीडी गावातील आदिवासींना भेटण्याचे आश्वासन दिले होते. प्रथम ते तिथे जातील आणि त्यांना भेटतील आणि त्यांच्या समस्या ऐकतील.” असे म्हटले आहे. तसेच काही विकास योजना सुरू करायच्या आहेत, त्यामुळे ते दौरा संपल्यानंतरच सिंगापूरला जाणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. दौरा पूर्ण केल्यानंतर, ते विशाखापट्टणमला पोहोचतील, जिथून त्यांच्या सिंगापूरला जाण्याची तयारी सुरू आहे.
शंकरची प्रकृती आता कशी आहे? Pawan Kalyan’s Son Injured ।
जनसेना पक्षाने एक पोस्ट करत मार्क शंकरच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यानुसार पोस्टमध्ये “शंकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.” मार्क शंकरचा जन्म १० ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. तो आता फक्त ८ वर्षांचा आहे आणि सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर लोक शंकरच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.





