‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १५ वर्ष पूर्ण; अंकिताने सुशांतसाठी शेअर केली भावूक पोस्ट

Ankita Lokhande Emotional post | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील दोघांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली. या मालिकेला आता १५ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त अंकिता लोखंडेने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अंकिताची पोस्ट
” ही १५ वर्ष फक्त अर्चना ही भूमिका साकारण्याची नाही तर अर्चना आणि मानव या जोडप्यातील प्रेम, लग्न, समजूतदारपणा आणि सहजीवन हे साकारणाऱ्या जोडीची आहे. ते खूप परफेक्ट आहेत. आपण हल्ली जे ‘गोल्स’ म्हणतो ना ते ते आहेत. त्यांनी मला परफेक्ट लग्न म्हणजे काय हे शिकवलं. माझी खात्री आहे कि अर्चना आणि मानव इतकं ऑनस्क्रीन परफेक्ट जोडी कुणी असूच शकत नाही आणि याचं सगळ्यात जास्त श्रेय जात ते या मालिकेच्या प्रेक्षकांना ज्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले.”
“आम्ही ती जादू करू शकलो कारण एकता मॅडमचा आमच्यावर विश्वास होता. मानवने अर्चनाला पूर्ण केलं. जेव्हा जेव्हा अर्चनाचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा मानवचीही लोकं आठवण काढतील कारण त्यांचा ‘पवित्र रिश्ता’ तितकाच पवित्र होता जितका ‘पवित्र रिश्ता’ माझा तुमच्यासोबत जोडला गेलाय. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आज मी जी काही आहे ते बानू शकले नसते. मानवशिवाय अर्चना असूच शकत नाही. जितकं हे माझं सेलिब्रेशन आहे तितकंच हे त्याचंही आहे.” Ankita Lokhande Emotional post |
View this post on Instagram
“तू जे काही मिळवलंस, जी काही तु अभिनयातून साध्य केलं, त्यासाठी आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आणि लक्षात ठेवा, ‘आसमान में जब तक सितारे रहेंगे, हम एक दूसरे के सहारे रहेंगे। नजदीकियां या हो दूरियाँ बस प्यार ही रहेगा दरमियाँ… पवित्र रिश्ता कायमच स्मरणात राहील. We miss you Sushant.” असे म्हणत तिने शेवटी सुशांतच्या आठवणीत पवित्र रिश्ता मालिकेच्या शीर्षक गीतातील काही ओळी लिहिल्या आहेत. या पोस्टबरोबर तिने तिचे आणि सुशांतचे काही खास सीन्स शेअर केले आहेत.
दरम्यान, या मालिकेतील मोठ्या यशानंतर सुशांत आणि अंकिताने चित्रपटांमध्येही काम केले. अंकिताने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर सुशांत देखील ने ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो चे’, ‘छिछोरे’ या चित्रपटांमध्ये मुख्यभूमिकेत झळकला. Ankita Lokhande Emotional post |
हेही वाचा:
दोन राज्यातील विधानसभेचा आज निकाल; अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत; तर सिक्कीममध्ये कोणाचे सरकार?





