Paud News : पौड येथील नागेश्वर मंदिराची आमदार शंकर मांडेकरांकडून पाहणी

पौड : पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची केलेली विटंबना 2 मे 2025 रोजी दुपारी झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पौड पोलिसांकडून नागेश्वर मंदिर व मज्जीदला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
झालेल्या घटनेमुळे दि. 4 (शनिवार) रोजी पौड गाव बंद ची हाक देण्यात आली. यानंतर पौड गावातून बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येऊन पौड दिगंबरनाथ मंदिर येथून निषेध मोर्चा काढला. पौड स्टॅन्ड, पुढील आळी, भोई आळी, बाजारपेठ, मागील आळी, कडू कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या समोर नागरिकांनी आपला निषेध व्यक्त केला. यावेळी दि. सोमवार (दि. 5) रोजी मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी पौड पोलीस स्टेशन येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नंतर नागेश्वर मंदिराची पाहणी केली. यावेळी नागेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला व त्याचे दर्शन घेतले. आमदार शंकर मांडेकर यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये मुळशीतील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.




