Satara | पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट प्रवेशासाठी मुदतवाढ

सातारा, (प्रतिनिधी) – येथील पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूटमध्ये महाराष्ट ्रशासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असून दि. 31 ऑगस्टपयर्र्त विविध कोर्सेसना प्रवेश सुरु असल्याची माहिती संस्थेचे संचालक सुनील कुमार व प्राचार्य सुजित पाटील यांनी दिली.
इलेक्ट्रीकल सुपरवायजर ऑन कस्ट्रक्शन साईट, अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, इलेक्ट्रीकल वायरमन, मोटार आर्मेचर वायडींग, टु व्हीलर व फोर व्हीलर मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर वुईथ एम.एस.ऑफिस, पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स, एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक, प्लंबर तसेच डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक, डिप्लोमा इन इलेक्टि ्रकलइत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश सुरु आहे.
या विविध कोर्सेससाठी शैक्षणिक पात्रता 8 वी, 10 वी, 12 वी पास/नापास आहे. तसेच कॉलेजमध्ये शिक्षण घोतअसलेल्या विद्यार्थी आणि कामगार,कर्मचारी यांना प्रवेश घेता येतो.
सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी, इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी भरपूर प्रॅक्टिकल घेतली जातात. विदयार्थ्यासाठी एस.टी. बस पास सवलत असून विविध जिल्हयातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळेल.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तसेच व्यवसायासाठी लागणार्या तसेच विविध लायसन संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थ्यानी शाळेचा मूळ दाखला, डुप्लीकेट दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, दहावी,बारावीचे मार्कशिट, सर्टिफिकेट व त्याच्या झेरॉक्स व सात फोटो,आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आणावीत.
माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत 100 रुपये असून मनीऑर्डरने 130 रुपये पाठवा. प्रवेश देण्याची अधिक माहितीसाठी संचालक सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट ्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. 11, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा. मो. 9822097071 ऑफिस वेळ सकाळी 10 ते 6 वेळेत संपर्क साधावा.





