Pimpri : धुक्यात हरविली वाट
Updated On:

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर व परिसर गुरुवारी रात्रीपासून दाट धुक्यात हरवून गेले होते. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. जिल्हाभरात थंडीसोबतच धुक्याची चादर दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहराबरोबरच शहराच्या परिसरात रात्रीपासूनच धुक्याची दाट चादर दिसून आली.
राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाली. त्यामुळे थंडीची लाट कमी झाली. मात्र बहुतांशी भागात थंडी कायम आहे.तर सकाळी हवेत दाट धुकेही जाणवत आहे.
आज राज्यातील कमी ठिकाणी 10 अंशांपेक्षा कमी तापमान होते. किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही काही भागात वाढ दिसून आली.





