Patan Election Results : दशकांपासून अभेद्य असलेला गड कोसळला! पाटण पंचायत समिती निवडणुकीत नेमकं काय घडलं?
Patan Election Results : अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या घोषणेने धनगर समाज शिवसेनेच्या पाठीशी ठाम; ऐतिहासिक विजयाने राजकीय समीकरणे बदलली.

Patan Election Results – पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा अनेक दशकांपासूनचा हेळवाक गट हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. या विजयामागे विविध सामाजिक व विकासात्मक निर्णय कारणीभूत ठरले असले तरी भव्य अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निर्णयामुळे धनगर समाज एकवटला आणि शिवसेनेच्या विजयाचा मार्ग अधिक सुलभ झाला.
पाटण तालुक्यातील धनगर समाज हा परंपरेने संघटित व ठाम भूमिका घेणारा समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाला राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातत्याने केले. यापूर्वी धनगर समाजातील हौसाबाई झोरे यांना संधी देत त्यांना पंचायत समितीवर प्रतिनिधित्व मिळवून दिले होते.
त्यांच्या विजयामुळे समाजात आत्मविश्वास निर्माण झाला आणि समाजाला राजकीय बळ मिळाले.त्यानंतर धनगर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते भागोजी शेळके यांनाही उमेदवारी देत समाजाला पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र, अत्यंत निसटत्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. या पराभवाची खंत आणि समाजाच्या प्रतिनिधित्वाची जाणीव धनगर समाजाच्या मनात कायम होती.
त्यामुळे यावेळी समाजाने एकजुटीने भूमिका घेत आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला होता. या निर्धाराचेच रूपांतर मतदानात झाले आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसून आला.या विजयात भागूजीशेठ शेळके, दगडू पाटील, लक्ष्मण झोरे (बॉक्सर शेठ), बबन झोरे, धनाजी शेळके, सुरेश शेळके, संदीप बावदाने, रघुनाथ दंडिले, महेश यमकर, दिनेश शेळके,
भैरू झोरे पैलवान, भास्करशेठ शेळके, तानाजी खरात, रामभाऊ यमकर, लक्ष्मण येडगे, राम बावदाने, आनंद झोरे, ज्योतिबा बावधाने, विठ्ठलबुवा शेळके, जानू झोरे, राम झोरे, जगन्नाथ बावधाने, गोरख झोरे, राहुल झोरे, विकास झोरे, सचिन पाटील, जयवंत शेळके, तानाजी झोरे, शिवाजी झोरे, भगवान झोरे, राजू शिंदे, राम यमकर, सिताराम यमकर, प्रकाश शेळके,
गोविंद आखाडे, विठ्ठल बोडके, जानू कोळेकर, सचिन एर, राजू काळे, महादेव येडगे, नितीन कोळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा निर्णय, समाजाला दिलेले प्रतिनिधित्व आणि समाजातील कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे धनगर समाज ठामपणे एकवटला. परिणामी, अनेक वर्षे अभेद्य मानला जाणारा विरोधकांचा बालेकिल्ला कोसळला.
विरोधकांचे पारंपरिक वर्चस्व कोसळले
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी वाडीवस्तीवर जाऊन व्यापक जनजागृती केली. विशेष म्हणजे अपघातात गंभीर जखमी होऊनही लक्ष्मण झोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या सहभागातून समाजाप्रती असलेली आत्मीयता आणि नेतृत्वावरील निष्ठा स्पष्टपणे दिसून आली.
गोकुळ तर्फ हेळवाक हा गट अनेक वर्षे विरोधकांचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, यावेळी धनगर समाजाने एकमुखी भूमिका घेत मतदानाचा कल बदलला. समाजाच्या एकजुटीमुळे विरोधकांचे पारंपरिक वर्चस्व कोसळले आणि शिवसेनेच्या उमेदवाराला निर्णायक विजय मिळाला.





