WI vs AUS : पॅट कमिन्सने घेतला करिश्माई कॅच, वेस्ट इंडिज अवाक्! VIDEO होतोय व्हायरल

WI vs AUS Pat Cummins stunning catch : ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स हा एक असा खेळाडू आहे, जो कठीण परिस्थितीत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपली छाप पाडतो. आता त्याने क्षेत्ररक्षणातही एक आश्चर्यकारक कामगिरी करत सर्वांना थक्क केले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने घेतलेला एक करिश्माई झेल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पॅट कमिन्सचा चमत्कारिक झेल –
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने स्वतःच्या गोलंदाजीवर असा झेल घेतला, की तो पाहून सर्वजण अवाक् झाले. एका क्षणासाठी कोणालाच विश्वास बसला नाही की कमिन्सने हा झेल खरंच टिपला आहे. हा झेल घेण्यासाठी त्याने आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि परिणामी प्रेक्षकांना क्रिकेटमधील सर्वोत्तम झेलांपैकी एक पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, कमिन्सने दुखापतीची पर्वा न करता चेंडूच्यादिशेने किती ताकदीने झेप घेतली आणि हा झेल टिपला.
पॅट कमिन्सने कसा घेतला आश्चर्यकारक झेल?
CUMMINS, YOU BEAUTY 🤯
Pat Cummins pulls off a diving, one-handed caught & bowled screamer to dismiss Keacy Carty 🔥#AUSvWI pic.twitter.com/0JxwJaz16t
— FanCode (@FanCode) July 4, 2025
हा अप्रतिम झेल वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील 9व्या षटकात पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा फलंदाज कीसी कार्टी कमिन्सच्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना करत होता. कमिन्सने टाकलेल्या गुड लेंथ चेंडूवर कार्टीने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने बॅटचा किनारा घेतला आणि पॅडला लागून हवेत उडाला. हवेत उडालेला चेंडू पाहून कमिन्स स्वतःला रोखू शकला नाही. त्याने फॉलो-थ्रू पूर्ण न करता चेंडूच्या दिशेने वेगाने धाव घेतली. चेंडू जमिनीला टेकणार इतक्यात कमिन्सने लांब झेप मारली आणि एका हाताने चेंडू पकडला. एका क्षणासाठी कोणालाच विश्वास बसला नाही की चेंडू कमिन्सच्या हातात आहे. खुद्द कीसी कार्टीही स्तब्ध झाला.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालच्या डीआरएसमुळे खळबळ! बेन स्टोक्सने अंपायरशी घातला तुफान वाद, पाहा VIDEO
वेस्ट इंडिजची निराशाजनक कामगिरी –
ग्रेनेडा येथे खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८६ धावांवर संपला. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ २५३ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले, तर जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सचा हा झेल क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे.





