Cummins Supports Imran : “इम्रान खान यांच्या जीवाला धोका!”; दोन्ही मुलांच्या मुलाखतीनंतर पॅट कमिन्स उतरला मैदानात; म्हणाला…
Cummins Supports Imran : पॅट कमिन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इम्रान खान यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याची आणि त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची आक्रमक मागणी केली आहे.

Pat Cummins Supports Imran Khan Health Concerns Jail Treatment Australia Captain Tweet : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत जागतिक क्रीडा विश्वात प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. रावळपिंडीच्या तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांच्या सुरक्षेवर त्यांच्या मुलांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इम्रान खान यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याची आणि त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची आक्रमक मागणी केली आहे. सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने या प्रकरणी उघडपणे भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
‘इम्रान खान यांना योग्य उपचार मिळायलाच हवेत!’; पॅट कमिन्सची थेट भूमिका –
इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत व्हायरल झाल्यानंतर पॅट कमिन्सने ‘एक्स’वर लिहिले, “माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपेल आणि इतर आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी घेतलेल्या भूमिकेचे मी समर्थन करत आहे. मला पूर्ण आशा आहे की न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांना योग्य ते वैद्यकीय उपचार तातडीने पुरवले जातील आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळेल. इम्रान खान हे एका सन्मानजनक वागणुकीचे खरे मानकरी असून त्यांच्यासोबत तसाच आदरयुक्त व्यवहार केला पाहिजे.”
Adding my support here to GC and the other former international captains. I hope the court ordered medical assessment be allowed to run its course, and that family visits continue. I hope Imran Khan is treated with the dignity anyone deserves https://t.co/L1L512wXao
— Pat Cummins (@patcummins30) August 28, 2026
लॉर्ड्स कसोटीदरम्यान मुलांचा स्काय स्पोर्ट्सवर खळबळजनक खुलासा –
Full interview of Imran Khan’s sons @Kasim_Khan_1999 and #SulaimanKhan with Former England Captain Michael Atherton. They shared latest health updates on Imran Khan and raised urgency on required medical treatment. #StopRiskingImranKhansLife pic.twitter.com/OtWaloOsUh
— Hamza Khanⁱᴾⁱᵃⁿ (@HamzaK921) August 27, 2026
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ब्रॉडकास्टर ‘स्काय स्पोर्ट्स’ने इम्रान खान यांच्या दोन्ही मुलांचा—सुलेमान आणि कासिम यांचा विशेष मुलाखतीचा व्हिडीओ प्रसारित केला. या मुलाखतीत त्यांनी वडिलांच्या जीवाला गंभीर धोका असल्याचा धक्कादायक दावा केला. तुरुंगात त्यांना योग्य वैद्यकीय सेवा दिली जात नसून त्यांची तब्येत वेगाने खालावत असल्याचा आरोप मुलांनी केला आहे. या व्हिडीओने जागतिक स्तरावर मानवाधिकारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
२०२३ पासून रावळपिंडीच्या तुरुंगात बंद; माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांचे पाक सरकारला पत्र –
७३ वर्षीय इम्रान खान यांना २०२३ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली रावळपिंडीच्या तुरुंगात डांबण्यात आले आहे. नुकतेच त्यांना इस्लामाबादच्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी आणले गेले होते, परंतु त्यानंतर लगेचच पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करत जगभरातील अनेक माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला औपचारिक पत्र लिहून दर्जेदार उपचारांची मागणी केली आहे. आता कमिन्सच्या या थेट समर्थनामुळे पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणखी वाढला आहे.





