Paris Olympics 2024 (Athletics) : धावपटू पारुल चौधरी पदकाच्या शर्यतीतून बाहेर…

Paris Olympics 2024 (Athletics,3000M SteeplChase Event) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 9वा दिवस आहे आणि स्टीपलचेसमध्येही भारताला निराशेचा सामना करावा लागला आहे. भारतीय धावपटू पारुल चौधरी ही 3000 मीटर स्टीपलचेस महिला पात्रता फेरीत 9:23.39 वेळ नोंदवत आठव्या स्थानावर राहिली. ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही कारण पात्रता फेरीतील अव्वल पाच खेळाडूंच पदक स्पर्धेत आगेकूच करू शकतात. यामुळे पारुल चौधरीची पदकाची आशाही संपुष्टात आली.
Parul Chaudhary finishes 8th (9:23.39) and misses out qualification mark in 3000m Steeplechase event.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Athletics @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @Media_SAI @AkashvaniAIR @DDNational @DDIndialive @DDNewslive @afiindia pic.twitter.com/uDwWQ5EFpK
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 4, 2024
दरम्यान, 29 वर्षीय भारतीय ॲथलीट महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस आणि 5000 मीटर स्टीपलचेस या दोन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रीय विक्रम धारक आहे.
गेल्या वर्षी हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने 5000 मीटरमध्ये सुवर्ण आणि 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते. याव्यतिरिक्त, आशियाई क्रीडा स्पर्धेत 5,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पारुल ही पहिली भारतीय महिला आहे.





