Paris Olympics 2024 (4x400m Relay) : भारतीय पुरूष रिले संघही अंतिम फेरी गाठण्यात अपयशी…

Paris Olympics 2024 (Athletics,Men’s 4x400m Relay Round 1) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (शुक्रवार,9 ऑगस्ट) भारताचा 14 वा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण पाच पदके जमा झाली आहेत. त्यात भारताने नेमबाजीमध्ये तीन पदके, हॉकीमध्ये एक कांस्य पदक आणि ॲथलेटिक्समध्ये एक रौप्य पदक जिंकले आहे.
ऑलिम्पिकमध्ये आज झालेल्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला रिले संघांची कामगिरी निराशाजनक राहिली. कारण, दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. भारतीय पुरुषांचा 4बाय 400 मी. रिले संघाने हीट शर्यतीत एकूण 10 व्या स्थानावर राहून अंतिम फेरीत स्थान गमावले.
मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हंगामातील सर्वोत्कृष्ट 3:00.58 सेकंदाची वेळ नोंदवली.भारताचा आशियाई विक्रम 2:59.05 सेकंदांचा आहे जो 2023 बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान सेट करण्यात आला होता.
Men’s 4 x 400 M Relay Round 1 – Heat 2👇🏻
Despite giving it their all, the Men’s relay team consisting of Muhammed Ajmal, Rajesh Ramesh, Amoj Jacob, and Muhammed Anas finished 5th in their Heat and thus were unable to advance to the final. With this performance they concluded… pic.twitter.com/2fPX2NM8KO
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2024
या प्रकारात, दोन्ही हीट मिळून बोत्सवाना (2:57.76), ब्रिटन (2:58.88) आणि यूएसए (2:59.15) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले या तिन संघासह एकूण आठ संघानी अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीची शर्यत आज मध्यरात्री 12.30 होईल.
Paris Olympics 2024 (4x400m Relay) : भारतीय महिला रिले संघाची निराशाजनक कामगिरी…
दुसरीकडे, भारतीय महिलांचा 4×400 मीटर रिले संघ देखील पहिल्या फेरीतील हीटमध्ये 16 सहभागी राष्ट्रांमध्ये 15व्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. भारतीय संघाच्या विथ्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूवम्मा आणि शुभा वेंकटेशन यांच्या चौकडीने 3:32.51 अशी वेळ नोंदवली आणि पहिल्या फेरीत एकूण 15वे स्थान तर हीट दोनमध्ये आठवे म्हणजेच शेवटचे स्थान मिळवले.





