Mundhwa Land Case : पार्थ पवार यांना न्यायालयाचा दिलासा; मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी करण्याची मागणी फेटाळली
Mundhwa Land Case : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Mundhwa Land Case : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली होती. (Mundhwa Land Case)
या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने न्यायालयात ठाम भूमिका मांडली. यापूर्वीही अशाच स्वरूपाची जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती, अशी बाब राज्य सरकारने निदर्शनास आणून दिली. तसेच, या प्रकरणाशी याचिकाकर्त्यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचा युक्तिवादही सरकारकडून करण्यात आला. (Mundhwa Land Case)
याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी अशाच प्रकारची याचिका फेटाळण्यात आलेली असताना, पुन्हा त्याच मुद्द्यांना घेऊन याचिका कशी दाखल करण्यात आली, असा थेट सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. (Mundhwa Land Case)
याशिवाय, कोणत्याही सखोल माहितीशिवाय आणि आवश्यक सामग्रीशिवाय याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले. दरम्यान, दाखल केलेल्या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले होते. (Mundhwa Land Case)
पुणे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आणि राजकीय वरदहस्तामुळे पुणे पोलीस पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. (Mundhwa Land Case)
तसेच, अमेडिया इंटरप्राइझेसमध्ये पार्थ पवार यांचा सुमारे ९९ टक्के हिस्सा असताना, कंपनीतील केवळ १ टक्का शेअरधारकाविरोधात गुन्हा नोंदवून पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. (Mundhwa Land Case)





