Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरने अलीकडेच नव्या घरात गृहप्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र यावेळी पती हिमांशू मल्होत्रा दिसला नाही. यावरून काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे. ज्यानंतर अमृताने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका नेटकऱ्याने अमृताच्या व्हिडीओवर कमेंट करत “या सोहळ्यात तुझा नवरा कुठे आहे?” असा प्रश्न विचारला होता. यावर अमृताने, “जा आणि माझा युट्यूब व्हिडीओ बघा…” असं उत्तर दिलं आहे. तर, दुसऱ्या एका युजरने व्हिडीओवर अमृता आणि हिमांशूच्या नात्याबद्दल नकारात्मक कमेंट केली. ‘तिचं तिच्या पतीसोबत विचित्र नातं असल्याचे दिसते’, अशी एक कमेंट युझरने केली. Amruta Khanvilkar |
त्यावर अमृताने रोखठोक उत्तर देत म्हंटले की, “यात काय विचित्र काय आहे? त्याला गृहप्रवेश पूजेला पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला. सगळेच मला या गोष्टीवरून बोलत आहे. तू एक फेसलेस व्यक्ती आहेस, जी डीपी सुद्धा ठेवत नाही आणि नकारात्मक विचार करते. जर कलाकार काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की ते कधीच काही बोलणार नाही. जरा सांभाळून बोलत जा. आई, वडील, बहीण हे आपलं कुटुंब नसतं का? की नवराच सर्वस्व आहे तुमचं? तसं असेल तर फारच बिचाऱ्या आहात तुम्ही आणि तुमचं आयुष्य”, असे सडेतोड उत्तर तिने दिले आहे. Amruta Khanvilkar |
दरम्यान, अमृता खानविलकरने नव्या घराला ‘एकम’ असं नाव दिलं आहे. “स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’…’एकम’ म्हणजे एक- जिथून सगळंच नव्याने सुरू होतं, उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ,”असं कॅप्शन देत अमृताने गृहप्रवेशाचा व्हिडिओ शेअर केला होता. Amruta Khanvilkar |
हेही वाचा:
धक्कादायक! ‘टोरेस’ पाठोपाठ मुंबईत आणखी एक घोटाळा उघड, गुंतवणुकदाराला लाखोंचा गंडा