Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज…! बुधवारपासून होणार प्रारंभ, जाणून घ्या स्पर्धेविषयी सर्व डिटेल्स एका क्लिकवर….

Paris Paralympics 2024 : – उन्हाळी ऑलिम्पिकनंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंचा मेळावा होणार आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा अथलीट येथे पोहोचतील. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेतील २२ खेळांमध्ये ४४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५४९ पदके असतील, त्यापैकी २३६ पदके महिलांसाठी असतील.
भारत यावेळी पॅरालिम्पिकमध्येही आपले सर्वात मोठे पथक पाठवत आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १८ पदके जिंकली असून यावेळी २५ पदके जिंकण्याच्या निर्धारानाने भारत या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतातील पॅरालिम्पिक खेळाडूंची पहिली तुकडी पॅरिसला रवाना झाली आहे. ही तुकडी शेवटचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक भालाफेकपटू सुमित अंतिलच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी रवाना झाली आहे.
With the #ParisParalympics2024🇫🇷 kicking off this week, get ready for some thrilling sporting action🥳🤩
Swipe left ⏩ to catch the weekly sports schedule, and keep chanting #Cheer4Bharat🇮🇳 with us👏💯@ pic.twitter.com/Q8pAssmF3M
— SAI Media (@Media_SAI) August 25, 2024
पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारतातील एकूण ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरालिम्पिक तुकडी आहे. यापूर्वी टोकियोमध्ये भारतातील ५४ खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय तुकडीमध्ये ३२ महिला पॅरा अथलीट्सचा समावेश आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत २२ खेळांमध्ये खेळाडू आव्हान देतील. भारतीय खेळाडू १२ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.भारत प्रथमच पॅरा सायकलिंग, पॅरा रोइंग आणि ब्लाइंड ज्युडोमध्ये सहभागी होणार आहे.
थेट प्रक्षेपण…
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारत किमान 25 पदके जिंकेल असा विश्वास भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी व्यक्त केला आहे. सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे खेळाडू उदघाटन सोहळ्यात ध्वजधारक असणार आहेत. पॅरालिम्पिक खेळांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनेलवर होईल. त्याचबरोबर जिओ सिनेमावर या खेळांचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.





