Paris Olympics 2024 (Women’s 10m Air Pistol Event) : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले कांस्यपदक…

Paris Olympics 2024 (Women’s 10m Air Pistol Event) : भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
ITS A BRONZE!!! Our first medal at @paris2024 comes in shooting courtesy of @realmanubhaker Fantastic shooting all along to bring home our first medal 🥉👏🏽👏🏽#JeetKiAur #Cheer4Bharat pic.twitter.com/hzTuN9G0I3
— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2024
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत मनूने सुरुवातीपासून अखेरपर्यंत तिसरे स्थान कायम राखले. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि किम येजीने 241.3 गुणांसह रौप्य पदक जिंकले.
मनू भाकरने पात्रता फेरीतही तिसरे स्थान पटकावले होते. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यासह तिने नेमबाजीत भारताचा 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदके जिंकली होती.





