Manu Bhaker Khel Ratna controversy : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मनू भाकरने दोन पदके मिळवून दिली होती. मात्र, केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांमध्ये मनूचे नाव नसल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे नवीन वादाला सुरुवात झाली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाने नावे अद्याप अंतिम केली नाहीत. आगामी आठवड्यामध्ये नावे निश्चित केली जातील, तेव्हा पुरस्कर्त्यांची नावे जाहीर होतील असे स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये, मनूने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकून एकाच खेळात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यांनी पुरस्कारासाठी अर्ज भरल्याचे मनूच्या कुटुंबीयांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामसुब्रमन्यम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय पुरस्कार समितीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल यांच्यासह माजी खेळाडूंचाही समावेश आहे. मंत्रालयाच्या नियमांनुसार, खेळाडूंना त्यांचे अर्ज स्वतः भरण्याची परवानगी आहे. ज्यांनी अर्ज केले नाहीत, त्यांच्या नावाचाही निवड समिती विचार करू शकते. मनूने अर्ज केला नसल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. मात्र, तिचे वडील रामकिशन भाकर यांनी अर्ज केल्याचे सांगितले. ते म्हणाले, “भारतात ऑलिम्पिक खेळांना महत्त्व नाही कारण दोन ऑलिम्पिक पदके जिंकूनही मनूला खेलरत्न पुरस्कारासाठी दुर्लक्षित करण्यात आले. सन्मानासाठी हात पसरावे लागत असताना देशासाठी खेळून पदके जिंकून काय उपयोग. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती सातत्याने सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करत आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. Mohammed Shami Fitness Update | मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCIने फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट… आगामी दोन-तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता क्रीडामंत्री मनसुख मांडविया या शिफारशीवर एक-दोन दिवसांत निर्णय घेतील आणि मनूचे नाव अंतिम यादीत येण्याची शक्यता आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिकमधील उंच उडी टी-६४ प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस समितीने केल्याचे समजते. याशिवाय ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्याची शिफारसही करण्यात आली आहे