Paris Olympics 2024 (Shooting) : अनंत-माहेश्वरी स्कीट मिश्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत, कांस्यपदकासाठी भारताची चीनशी होणार लढत…

Paris Olympics 2024 (Shooting, Mixed Team Skeet Bronze Medal Match) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 10वा दिवस आहे आणि भारतासाठी सोमवारी आनंदाची बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणखी एका पदकाच्या जवळ आला आहे. वास्तविक अनंतजितसिंग नारुका आणि महेश्वरी चौहान ही भारतीय जोडी स्कीट मिश्रित स्पर्धेच्या कांस्यपदक सामन्यासाठी पात्र ठरली आहे. कांस्यपदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे. भारत आणि चीनच्या जोडीने समान 146 गुण मिळवले आणि संयुक्त तिसरे स्थान मिळवून कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली.
Skeet Mixed Team Qualification👇🏻
Chance for a Bronze!
Mixed pair of Maheshwari Chauhan and Anantjeet Singh Naruka, finish 4th in qualification. With a total score of 146, they have qualified for the Bronze medal match later today at 6.30 pm IST.
They will face China for the… pic.twitter.com/lNOKUrwfsn
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
सुवर्णपदकाचा सामना इटली आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. माहितीसाठी, या स्पर्धेत पात्रता फेरीतील अव्वल दोन संघ सुवर्णपदक लढतीसाठी पात्र ठरतात, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाची कांस्यपदकासाठी लढत होते.
भारतीय जोडीने पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली असून आता अनंत-माहेश्वरी जोडीकडून कांस्यपदक मिळवण्याची अपेक्षा आहे. सोमवारी (दि. 5 आॅगस्ट) संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून भारत आणि चीन यांच्यात कांस्यपदकासाठी सामना रंगणार आहे.





