Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पॅरिसला पोहोचला राहुल द्रविड, समोर आले खास फोटो….

Rahul Dravid At Paris Olympics 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पॅरिसला पोहोचला आहे. द्रविड ऑलिम्पिकचा आनंद लुटत असल्याचे फोटो समोर आले आहेत.
राहुल द्रविड टी-20 विश्वचषक 2024 पर्यंत टीम इंडियाचा प्रशिक्षक होता. भारतीय संघाने 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला. मुख्य प्रशिक्षकपद सोडताच द्रविडची टीम इंडियाच्या सर्व जबाबदारीतून मुक्तता झाली. अशा परिस्थितीत आपल्या मोकळ्या वेळेचा फायदा घेत त्याने पॅरिस गाठले असून तेथे द्रविड ऑलिम्पिकचा आनंद लुटत आहे.
Rahul Dravid in the house! Cheering Hockey 🇮🇳 Team at #Paris2024 #Olympics LIVE now #INDvARG 🏑 pic.twitter.com/W3Hwq8H5Br
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सोमवारी भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील हाॅकीचा सामना पाहताना राहुल द्रविड प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसून आला.
Rahul Dravid was there in the Paris Olympics last night to support Indian Athletes. 👏 pic.twitter.com/Ocsvvl3yWO
— Johns. (@CricCrazyJohns) July 29, 2024
त्याआधी द्रविडने ऑलिम्पिकमधील पुरुष दुहेरीची टेनिस स्पर्धा पाहिली, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजीची भारतीय जोडी ॲक्शनमध्ये होती. मात्र, या भारतीय जोडीला फ्रेंच जोडीने सामन्यात पराभूत केले.
कांस्यपदक विजेत्या मनूचे केले कौतूक….
#WATCH | Paris, France: On Shooter Manu Bhaker winning Bronze medal in Women’s 10 M Air Pistol at #ParisOlympics2024, former coach of Indian Cricket Team Rahul Dravid says, “… To come here and to be able to get over her past failures and win a bronze medal is a phenomenal… pic.twitter.com/voZW2Z9cgE
— ANI (@ANI) July 28, 2024
राहुल द्रविडने पॅरिसमध्ये 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनू भाकरचे कौतूक देखील केले. मनू भाकरबाबत द्रविड म्हणाला की, “मनूची कहाणी विलक्षण आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील निराशेनंतर येथे येणे आणि पदक जिंकणे ही एक विलक्षण कामगिरी आहे. अशा खास दिवशी येथे आल्याने मला बरे वाटले. वर्षानुवर्षे केलेले बलिदान, परिश्रम आणि समर्पण यातूनच असे यश मिळते. एखाद्या खेळाडूसाठी हे सोपे नसते.”
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटवर राहुलने मांडले मत….
Rahul Dravid speaking about Manu Bhaker’s medal victory in the Chat show at India house 🇮🇳 [RevSportz] pic.twitter.com/3GCNiDxONp
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2024
याशिवाय एका चर्चेत द्रविडने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट यावर मत मांडले . तो म्हणाला की, “मी ड्रेसिंग रूममध्ये याबद्दल गंभीर चर्चा ऐकली आहे. लोक 2026 मध्ये टी-20 विश्वचषक, 2027 मध्ये होणारा विश्वचषक आणि 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांबद्दल बोलत आहेत. मी असे ऐकले आहे की, 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश असणार आहे.” द्रविड पुढे म्हणाला की, “क्रिकेटर्सनाही सुवर्णपदक जिंकायचे आहे. पोडियमवर उभे रहायचे असून एकरा मोठ्या क्रीडा स्पर्धेचा भाग व्हायची क्रिकेटर्सची इच्छा आहे.”





