Vinesh Phogat : सुजलेले डोळे, खोटं हसणं, हाताला सलाईन… ‘विनेश फोगट’चा हॉस्पिटलमधील पहिला फोटो समोर

नवी दिल्ली – महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक-2024 मधील पदक जास्त वजनामुळे गमवावे लागले आहे. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती खालावली होती त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देश विनेशसोबत आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही तिच्याबाबत वक्तव्य केले असून त्या विनेशला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या आहेत.
विनेशने पॅरिस ऑलिम्पिक-2024 मध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून किमान रौप्य पदक मिळवले होते. मात्र जेतेपदाच्या सामन्यापूर्वी तिचे वजन मोजले असता ते 100 ग्रॅम अधिक निघाले. या कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचे वजन दोन किलोने जास्त होते, जे कमी करण्याचा तिने सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु 100 ग्रॅम अजूनही शिल्लक होते आणि त्यामुळे ती आजारी पडली.
President of the Indian Olympic Association (IOA) PT Usha met Indian wrestler Vinesh Phogat, in Paris, France
She was disqualified today from the Women’s Wrestling 50kg for being overweight.
(Pic source: IOA) pic.twitter.com/eKRCilr2lG
— ANI (@ANI) August 7, 2024
पी.टी.उषा यांनी जाणून घेतली प्रकृती –
वजन कमी करण्यासाठी विनेशने सायकल चालवली. पाणी प्यायले नाही, सतत व्यायाम केला. पण तरीही 100 ग्रॅम वजनामुळे ती इतिहास रचण्यात चुकली. तिने रौप्य किंवा सुवर्णपदक जिंकले असते तर ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली असती. सध्या विनेश रुग्णालयात असून पीटी उषा यांनी तिची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत विनेश हसत आहे, पण तिचे डोळे सुजले आहेत. हाताला सलाईन लावलेले आहे.
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अप्रतिम –
ऑलिम्पिक फायनलपर्यंतचा विनेशचा प्रवास अप्रतिम होता. तिने अटीतटीच्या लढतीत जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून सर्वांनाच चकित केले. तिने दमदार कामगिरी दाखवली आणि अंतिम फेरी गाठली पण कदाचित नशिबाने काही वेगळेच ठरवलेले असेल.





