Paris Olympics 2024 (Women’s 10m Air Pistol Event) : मनू भाकरची अंतिम फेरीत धडक, भारताला मिळू शकते पहिले पदक….

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. नेमबाजी व्यतिरिक्त रोइंग, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये भारत आज सहभागी होताना दिसणार आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा शुक्रवारी शुभारंभ झाला आहे.
आज 10 मीटर एयर रायफल मिक्स्ड टीम इवेंट आणि पुरूषाच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हाती निराशा आल्यानंतर आता महिलाच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. तिने पात्रता फेरीत 580 गुण मिळवले आणि ती तिसऱ्या स्थानी राहिली.
Shooting Update 🚨
🔫 Manu Bhaker finishes third with 580 points & Qualify for the Final of Women’s 10m Air Pistol event.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #OlympicGames @DDIndialive @DDNewslive @AkashvaniAIR @MIB_India @IndiaSports @PIB_India @IndiaSports @mansukhmandviya… pic.twitter.com/i90790XOlf
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 27, 2024
त्याचवेळी भारताची रिदम सांगवान 15 वे स्थान मिळवून पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. सांगवानने 573 गुण मिळवले. या प्रकारात अव्वल 8 खेळाडू हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे रिदम अपात्र ठरली असून तीचे पदकाचे स्वप्न भंग झाले आहे.
मनू आता रविवार, 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता अंतिम फेरीत सहभागी होणार आहे आणि ती भारतासाठी पदकाचे खाते उघडू शकेल. अंतिम फेरीत आठ नेमबाज सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या तीन पदकांसाठी स्पर्धा करतील.





