Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनने रचला इतिहास! बॅडमिंटन एकेरीची गाठली उपांत्य फेरी…

Paris Olympics 2024 (Badminton) : अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताचा बॅडमिंटन पटू लक्ष्य सेनने चायनीज तैतेईच्या चोयू टिएन चेन याला १९-२१, २१-१५, २१-१२ असे पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. लक्ष्यपूर्वी किदाम्बी श्रीकांत (ऑलिम्पिक 2016) आणि पारुपल्ली कश्यप (ऑलिम्पिक 2012) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता लक्ष्य पदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
पहिल्या सेटमध्ये चोयू टिएन चेनने १२-९ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, लक्ष्य देखील सातत्याने गुणांची कमाई करत होता. लक्ष्यने १४-१५ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर लक्ष्यने आजून आक्रमक खेळाला सुरुवात केली. यावेळी त्याने चेनच्या शरिरावर जाणारे फटाके मारले. त्यामुळे त्याला ४ गुण मिळविता आले. त्यामुळे १७-१५ अशी आघाडी झाली. त्यानंतर देखील तैपेईच्या चेन ने सेट १८-१८ असा बरोबरीत आणला. चेनने २०-१८ अशा आघाडीसह गेम पॉईंट मिळवला आणि स्मॅशच्या जोरावर पहिला गेम २१-१९ असा जिंकला.
🇮🇳 Result Update: #Badminton🏸 Men’s Singles QF👇
In(Sen) Lakshya😍, ladies and gentlemen👀😎
A tough battle against Former World no. 2, Chinese Taipei’s Chou Tien Chen. But Lakshya prevails with a scoreline of 19-21, 21-15 & 21-12🥳
Off to the Semis now✅
All the best… pic.twitter.com/INi8QsZTmb
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
लक्ष्यने दुसऱ्या सेटची सुरुवात २-० अशा आघाडीने केली. लक्ष्यने जोरदार पुनरागम केले होते. मात्र त्यानंतर चेनने १-४ अशा पिछाडीवरून गेम ४-४ असा बरोबरीत आणला. त्याटणार चेनची ११-१० अशी आघाडी घेतली होती. लक्ष्य दोन गुण वसूल करून १३-११ अशी मोडून काढली. लक्ष्यने ही आघाडी १८-१३ अशी भक्कम केली आणि गेम पॉईंट कमावला. लक्ष्यने दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामना बरोबरीत आणला.
तिसरा सेट दोन्ही खेळाडूंसाठी महत्वाचा होता. यावेळी लक्ष्यने ११-७ अशी आघाडी ४ गुणांची आघाडी घेतली. त्यामुळे लक्ष्यचा विजय आटोक्यात आला होता. लक्ष्यने त्यानंतर एक -एक गुण वसूल केले आणि २१-१२ असा तिसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या सेटच्या विजयाने लक्ष्यसाठी उपांत्य फेरीची कवाडे देखील उघडी झाली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
पुढील आव्हान खूपच कठीण…
लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरी त्याच्यापुढील आव्हान खूपच कठीण आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना व्हिक्टर ॲक्सेलसेन विरुद्ध कीन ये लोह सामन्यातील विजेत्याशी होईल. व्हिक्टर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. विशेषत: ॲक्सेलसेनविरुद्ध लक्ष्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. लक्ष्यला आजपर्यंत त्याच्याविरूध्द 8 पैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे.





