Donald Trump : अध्यक्षपदाच्या सामर्थ्यामुळेच हल्ला झाला; अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
रविवारी झालेल्या ताज्या प्राणघातक हल्ल्यानंतर अवघ्या एका तासातच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) व्हाइट हाऊसच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी आपल्यावर या हल्ल्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दर्शवले.

Donald Trump : रविवारी झालेल्या ताज्या प्राणघातक हल्ल्यानंतर अवघ्या एका तासातच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) व्हाइट हाऊसच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी आपल्यावर या हल्ल्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दर्शवले.
आपल्यावर हल्ला झाला, याचे कारण आपण सामर्थ्यशाली असल्याचे त्यांनी सांगितले. जेंव्हा तुम्ही सामर्थ्यशाली असता, तेंव्हा तुमच्यामागे लोक लागतात, पण जेंव्हा तुम्ही सामर्थ्यशाली नसता, तेंव्हा लोक तुम्हाला एकटे सोडून देतात, असे ट्रम्प (Donald Trump) म्हणाले.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ट्रम्प यांनी स्वतःला एक अविचल नायक, संकटातून वाचलेला एक अजिंक्य योद्धा म्हणून सादर करण्याची त्यांची प्रवृत्ती अधोरेखित झाली.
घडलेल्या घटनेतून त्यांनी स्वतःला प्राधान्य मिळण्याविषयीचे नेहमीसारखे सूचक वक्तव्य केले. पण या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचे आपल्याला वाटत नसून सविस्तर तपास अहवाल मिळाल्यानंतरच त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी व्हाइट हाउसच्या (Donald Trump) कॉरस्पॉन्टन्ड डिनरच्या समारंभामध्ये सुरक्षा अलर्ट मिळताच उपस्थित असलेल्या २,६०० लोकांपैकी अनेकांनी जमिनीवर झेप घेतली, तर दुसरीकडे सिक्रेट सर्व्हिसने अध्यक्ष आणि इतर मान्यवरांना घाईघाईने तेथून नेले. या घटनेनंतर हा कार्यक्रम हॉटेलऐवजी व्हाइट हाउसमध्येच आयोजित करण्यात यायला हवा होता, असा युक्तिवाद केला जातो आहे.
तसेच सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी आढळल्याची टीकाही होते आहे. बॉलरूमचे बांधकाम एका प्रलंबित खटल्यामुळे रखडले आहे. तो प्रलंबित खटला रद्द करण्याची विनंती न्याय विभाग एका न्यायाधीशांना करेल, असे कार्यवाहक ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी म्हटले आहे.






